ई पिक पाहणी साठी पुन्हा मुदतवाढ, आता या तारखेपर्यंत करता येणार ई पिक पाहणी

विविध सरकारी शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी गतवर्षीपासून ई पिक पाहणी आवश्यक केली आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकाची पीक पाहणी करूनच विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.

आता यावर्षी तर ई पिक पाहणी साठी शेतकरी खूप बेजार होताना दिसत आहे. काही शेतकऱ्यांची तर अजून सुद्धा ई पिक पाहणी करायची राहिली आहे. ई पीक पाहणी म्हणजे आपल्या शेतात जाऊन आपल्या पिकाविषयी माहिती त्या ई पिक पाहणीच्या ॲप मध्ये भरणे.

हे वाचा: 8 मजुरांचे काम फक्त एका जुगाड द्वारे, शेतकरी मित्रांनो आताच करा पैशाची बचत पहा लवकर indian jugaad

तसे न केल्यास तुमचा सातबारा कोरा राहण्याची देखील शक्यता असू शकते. असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाहणी नाही केली तर तुमची जमीन पडीक असल्याचे ग्राह्य धरले जाते.

त्यामुळे शेतकरी सरकारने राबवलेल्या विविध भरपाई योजनेपासून वंचित राहू शकतो. त्यामुळे ई पीक पाहणी करणे आवश्यकच आहे. परंतु दरवर्षीपेक्षा यावर्षी ई पिक पाहण्यासाठी खूप कमी प्रतिसाद मिळाला आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणी करण्याच्या राहिल्या आहेत. आता अशा शेतकऱ्यांसाठी तिसऱ्यांदा ई पिक पाहण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची अजून सुद्धा घ पीक पाहणी करण्याची राहिली आहे.

हे वाचा: फ्री मध्ये करा आधार कार्ड डाउनलोड; ते पण आपल्या मोबाईल मधून adhar card download

अशा शेतकऱ्यांना दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत खरीप पिकाची ई पीक पाहणी करता येईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची अजून सुद्धा ई पिक पाहणी करायची राहिली आहे. अशा शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर पर्यंत ई पिक पाहणी करून घ्यावी. अन्यथा तुम्ही विविध भरपाई पासून वंचित राहाताल e pik pahani

Leave a Comment