गट नंबर टाकून मिळवा आपल्या शेत जमिनीचा नकाशा घरी बसल्या..! Land map

शेतकरी बंधूंनो, तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा घरी बसल्या कसा मिळवायचे हे माहित आहे का..? पूर्वीच्या काळात शेत जमिनीचा नकाशा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या कार्यालयात जाऊन विविध प्रक्रिया करून, पैसे खर्च करून जमिनीचा नकाशा मिळत होता.

परंतु आता तुम्हाला वरील कोणतेही कामे करण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकार द्वारे जमिनीचा नकाशा घरी बसल्या काढण्यासाठी एक नवीन वेबसाईट पोर्टल सुरू केले आहे. वेबसाईटचा उपयोग तुम्ही तुमचा गट नंबर टाकून सहजरीत्या तुमच्या जमिनीचा नकाशा मिळवू शकता. land map

हे वाचा: ई पिक पाहणी करा फक्त पाच मिनिटात मोबाईल ॲप हँग न होता..! जाणून घ्या प्रक्रिया

नकाशा मिळवण्यासाठी ची प्रक्रिया..?

सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर जावे लागेल..

http://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp

हे वाचा: महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव 5 सप्टेंबर 2023

त्यानंतर तुम्ही ज्या राज्यात राहतात ते राज्य, जिल्हा, तालुका व तुमचे गाव निवडावे लागेल. नंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा गट नंबर टाकावा लागेल. गट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या शोध बटणावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर शेत जमिनीचा नकाशा पाहायला मिळेल.

आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की नकाशा डाऊनलोड कसा करायचा..? तर चला जाणून घेऊया प्रक्रिया तुम्ही तुमच्या शेतजमीन नकाशाचा स्क्रीन शॉट घेऊ शकता. त्यानंतर त्याची प्रिंट काढून घेऊ शकता.

राज्य सरकार द्वारे ही वेबसाईट शेतकऱ्यांसाठी शेतजमीन मोजण्यासाठी सुरू केली आहे. या वेबसाईटमुळे शेतकऱ्यांना त्यांच्याशी जमिनीचा नकाशा सहजपणे मिळवता येईल.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! एका महिन्याच्या आत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 25 टक्के आगाऊ पिक विमा

नकाशा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment