गणपती विसर्जन राज्यातील या भागात आज मुसळधार पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थान मधून परतीच्या पावसाने माघार घेतल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच 27 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली.

आज म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्र मध्ये मध्य कोकण, मराठवाडा, व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रात इथून पुढे असे राहणार हवामान...! अवकाळी पाऊस पडणार का..? पंजाबराव डख यांनी सांगितले स्पष्ट Panjab Dakh

तर राज्यातील उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. व काही ठिकाणी विजानसह पावसाचा येल्लो अलर्ट आहे. बऱ्याच दिवसाचा पावसाचा खंडानंतर राज्यांमध्ये परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान तर मिळालेच परंतु याचा मोठा फायदा रब्बी हंगामाला देखील होणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमान समुद्रात लवकरच चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानंतर 30 सप्टेंबर दरम्यान या भागात अनुकूल वातावरण तयार होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हे वाचा: पुढील 48 तासात या जिल्ह्यात अति जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट

त्याचबरोबर छत्तीसगड परिसरातही चक्रीय वारे वाहत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रणालीमुळे उत्तर कर्नाटक किनारपट्टी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच उत्तर कर्नाटक तसेच तामिळनाडूच्या किनारालगत चक्रावर वाऱ्याचे प्रणाली तयार झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबर दरम्यान मान्सून राजस्थान मधून माघारी फिरला. राजस्थान मधून मान्सून माघारी फिरून दोन दिवस झाले आहेत. परंतु मान्सूनच्या परतीच्या पावसाचा प्रवास जयसे थे वैसे आहे.

येत्या दोन दिवसात मान्सून निघण्यासाठी आणखीन पोषक वातावरण तयार होईल. व त्यामुळे वायव्य आणि पश्चिम भारताच्या आणखीन काही भागांमधून मान्सून पुन्हा परतेल अशी माहिती हवामान विभागाकडून सांगण्यात आली आहे.

हे वाचा: राज्यात 16, 17, 18 ऑक्टोबर दरम्यान या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज

वायव्य आणि पश्चिम भारतातून मान्सून मागे फिरल्यामुळे येत्या काही दिवसात तेथे हवामान कोरडे होऊन तापमानात किंचित वाढ होऊ शकते. हवामान विभागाने 28 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

यामध्ये कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. व त्याचबरोबर ठाणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना देखील पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे.

Leave a Comment