गनरायला निरोप देण्यासाठी वरून राजा सज्ज ठिकठिकाणी मुसळधार पाऊस..!

आज गणपती बाप्पाचा विसर्जनाचा दिवस राज्यभरात ठिकठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठमोठ्या मिरवणुका निघाल्या आहेत. गणरायाला निरोप देण्यासाठी वरून राजा सुद्धा राज्यातील विविध भागात सज्ज झाला आहे.

आज दुपारी चार वाजल्यापासूनच राज्यातील विविध ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होऊन. आभाळ गडगडत होते. परंतु अखेर राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी चांगलीच लावली आहे. आठवड्यातील परभणी जिल्ह्यातील विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.

हे वाचा: IMD: राज्यातील या 5 जिल्हात मुसळधार पाऊस heavy rain in maharashtra

गेल्या चार दिवसापासून राज्यात विविध भागात कमी जास्त पाऊस सुरू होता. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढचे 24 तास देखील पावसाचा जोर महाराष्ट्रातील विविध भागात पाहायला मिळणार आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात अति मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे.

येत्या 24 तासात विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ बरोबरच मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली आहे.

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 घंट्यात मुंबई ठाणे आणि पालघर मध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण राहणार आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे.

हे वाचा: राज्यात 16, 17, 18 ऑक्टोबर दरम्यान या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज

Leave a Comment