पंजाबराव डख म्हणतात राज्यात अजुन इतके दिवस पावसाचे..!

panjab dakh सध्याच्या वेळेत क देशांमध्ये मान्सूनचा काळ संपत आला आहे. यावर्षीच्या हंगामात मान्सून येण्यासाठी फार उशीर झाला. दरवर्षी महाराष्ट्र राज्यात मान्सून हा सात जूनच्या दरम्यान येतो परंतु यावर्षी जून महिना संपून गेला होता.

तरीसुद्धा मान्सूनची काही चाहूल नव्हती. सर्वात अगोदर मान्सूनची सुरुवात होती ती कोकणापासून संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पसरण्यापूर्वी कोकणात प्रथम मान्सून पोहोचतो.

हे वाचा: rain update: आज पासून राज्यातील या भागात होणार पावसाला सुरुवात..! वाचा सविस्तर

यावर्षी मान्सून कोकणातच उशिरा पोहोचल्यामुळे व तेथे त्याची गती मंदावल्यामुळे मान्सूनची प्रगती थांबली व जून मध्ये येणारा मान्सून जुलैमध्ये महाराष्ट्रात दाखल झाला. त्याचा परिणाम खरीप हंगामातील पेरण्यावर झाला. जून महिन्याच्या सुरुवातीच्या कालावधीत होणाऱ्या पेरण्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला झाल्या.

जुलैमध्ये मात्र पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंतामणी मिटली. परंतु ऑगस्टमध्ये राज्यात तब्बल पावसाने 21 दिवसाचा खंड दिला. त्यामुळे परत एकदा या पावसाचा परिणाम खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तुर, या पिकावर झाला.

दरम्यान महाराष्ट्र ११ सप्टेंबर नंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला. व 19 आणि 20 सप्टेंबर पासून तो सर्वत्र राज्यात पसरला आहे. विविध भागात मुसळधार त्या अती मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांनो रब्बी हंगामात पाऊसच पाऊस..! पहा कृत्रिम रित्या पडणार पाउस Artifical rain in Maharashtra

havaman andaj हवामान विभागाचे प्रसिद्ध हवामान अभ्यासाक यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये एक ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील लातूर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर याचबरोबर बीड, सोलापूर, नगर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे पंजाबराव यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व नागरिकांना अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव म्हणतात की 2 ऑक्टोबर नंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होईल.

व 5 ऑक्टोबर नंतर राज्यातील हवामान कोरडे राहील. परंतु नवरात्रच्या कालावधीत पाऊस पुन्हा चांगली हजेरी लागेल असे सुद्धा त्यांनी त्यांच्या अंदाजात नमूद केले आहे. यावर्षी नवरात्र उत्सव हा ऑक्टोबर महिन्यातील 19 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत आहे. यादरम्यानच पंजाबराव यांनी महाराष्ट्रात पाऊस दर्शवला आहे.

हे वाचा: IMD: महाराष्ट्रातील या 3 जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस

राज्यात अजून किती दिवस पावसाचे..?, महाराष्ट्रातील पाऊस, हवामान अपडेट, हवामान अंदाज, अजून पाऊस किती दिवस पडणार..?

Leave a Comment