पंजाबराव डख यांचा पावसाबद्दल मोठा अंदाज, ऑक्टोबर महिन्यातील या तारखेपासून मुसळधार पाऊस..!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या मान्सूनचा पाऊस अंतिम टप्प्यात आहे. व 4 ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे.

हवामान विभागाचे तज्ञ पंजाबराव डख यांनी सुद्धा सांगितले होते की, पाच ऑक्टोबर नंतर राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांचा ऑक्टोबर महिन्यातील पावसाचा अंदाज सुद्धा जाहीर केला होता.

हे वाचा: 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान कसे राहणार हवामान..? पंजाबराव डख यांचा अंदाज panjab dakh news

पंजाबराव यांच्या माहितीनुसार राज्यामध्ये 2 ऑक्टोबर पासून सूर्यदर्शन होईल. व त्यानंतर 5 ऑक्टोबर पासून राज्यात सर्वत्र कोरडे हवामान होऊन कडक ऊन पडेल. त्याचबरोबर सहा ऑक्टोबर पासून राज्यातील मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू होईल.

5 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील वाशिम, पुसद, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उदगीर, अकोला, लातूर या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

त्याचबरोबर विदर्भातील देखील बऱ्याच जिल्ह्यात यादरम्यान पाऊस होणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. पंजाबराव म्हणतात की, नवरात्र उत्सवात, पाऊस पुन्हा एकदा जोर धरू शकतो. नवरात्रीच्या नऊ दिवसात म्हणजेच 15 ऑक्टोबर पासून ते 24 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस पुन्हा एकदा चांगलीच हजेरी लावणार असल्याची माहिती पंजाबराव यांनी दिली आहे.

हे वाचा: पंजाब डख, महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस. heavy rain maharashtra

Leave a Comment