पंजाबराव म्हणतात या तारखेपर्यंत काढा सोयाबीन..! नाहीतर होईल नुकसान soyabean

महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी हवामानाविषयी एक नुकताच नवीन अंदाज दिला आहे. गेल्या चार-पाच दिवसापासून राज्यामध्ये चालू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांना सुकवला आहे. राज्यातील विविध भागात सतत मुसळधार पाऊस पडत आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागात काल रात्रीपासून पासुन पावसाचा जोर वाढला आहे. विशेष म्हणजे विदर्भातील नागपूर विभागात पावसाची लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 22 सप्टेंबर दरम्यान नागपूर जिल्ह्यात ढगफुटी सारखा पाऊस पाहायला मिळाला. त्यामुळे नागपूर मध्ये विविध भागात पाणीच पाणी पाहायला मिळाले.

हे वाचा: कुसुम सोलर पंप अनुदान योजना..! असा करा ऑनलाईन अर्ज; पहा कागदपत्रे कोण कोणती लागतात..? Solar Pump Online Form Kasa Bharaycha

महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी तर आपण सततच पूर परिस्थिती पाहिलेली आहे. परंतु आता उपराजधानी मध्ये सुद्धा यावर्षी पाणीच पाणी पाहायला मिळाले.

या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच दडी मारली होती. परंतु आता सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे चांगले आगमन झाल्यामुळे शेतकरी राजा समाधानी आहे.

परंतु गेल्या दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे काही ठिकाणची जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान देखील झाले आहे. दरम्यान याबाबत माहिती हवामान विभागाचे प्रख्यात तज्ञ पंजाबराव यांनी दिली आहे.

हे वाचा: मोदी सरकार देणार या लोकांना मोफत गॅस सिलेंडर..! वाचा सविस्तर

पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात 28 सप्टेंबर दरम्यान पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. त्यांनी त्यांच्या अंदाजामध्ये असेही नमूद केले आहे की, गणपती विसर्जनापर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.

परंतु या काळात राज्यात मुसळधार पाऊस होणार नसून विविध भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याची माहिती दिली आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, परभणी, बुलढाण्यासह राज्यभर पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज देखील दिला आहे.

याव्यतिरिक्त पंजाबराव यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचा कृषी सल्ला देखील दिला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना 3 ऑक्टोबर पूर्वी सोयाबीन काढणीचा सल्ला दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार पाच ऑक्टोबर नंतर राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हे वाचा: यावर्षी कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव ;जाणून घ्या

पंजाबराव यांचा अंदाजानुसार यावर्षी महाराष्ट्रात पाऊस दसरा दिवाळीपर्यंत राहणार आहे. त्याचबरोबर राज्यात 10 ऑक्टोबर नंतर पुन्हा पावसाला सुरुवात होईल असे भाकीत देखील त्यांनी केले आहे.

Leave a Comment