परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होणार का? माणिकराव खुळे

मान्सूनचा परतीचा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही. असे माणिकराव खुळे म्हणतात पंजाब हरियाणा युपी बिहार मार्गे महाराष्ट्रात परतीचा मान्सून दाखल होण्याची तारीख आणि आपली सोयाबीन काढणीची वेळ एक येणार आहे का..?

किंवा परतीचा पाऊस जो महाराष्ट्रात दाखल होणार आहे त्या वेळेस आपल्या सोयाबीनचा हार्वेस्टिंग सुरु असतानाच नुकसान होऊ शकता का..? याबाबत माणिकराव खुळे काय म्हणतात हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत.

हे वाचा: येत्या 48 तासात राज्यातील या भागात होणार पावसाला सुरुवात...! हवामान विभागाचा इशारा

माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार परतीचा मान्सून जो असतो तो सरासरी 17 सप्टेंबरला परत फिरत असतो त्याचा परतीचा प्रवास सुरुवात करत असतो. परंतु या वर्षी त्याने अद्यापही परतीचा प्रवास सुरुवात केलेला नाही 17 सप्टेंबर उलटुन गेलेलं आहे.

आता ज्येष्ठ हवामान तज्ञ आणि माजी निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव मुळे साहेबांनी काय सांगितले तर ते असं म्हणतात की 27 सप्टेंबर च्या दरम्यान मान्सून परतीचा प्रवास सुरू करू शकतो. आता दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी दहा दिवस लेट मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो.

याचा अर्थ सरासरीनुसार महाराष्ट्र मध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख ही 10 ऑक्‍टोबर आणि मान्सून दाखल चाहूल असते 5ऑक्टोबर तर 10 ऑक्‍टोबरला मान्सून दाखल होत असून दरवर्षी तर या वर्षी दहा दिवस लेट असल्याकारणाने दहा दिवस लेट दाखल होणार का तर याबद्दल आणि खुळे साहेब म्हणतात की तसे होणार नाही.

हे वाचा: येत्या 24 तासात या भागांना झोडपणार मुसळधार पाऊस..!

तो 10 ऑक्टोबर च्या दरम्यानच दाखल होण्याची शक्यता आहे आणि सरासरीनुसार 10 ऑक्‍टोबर ते 15 ऑक्टोबर च्या दरम्यान महाराष्ट्रात परतीचा पाऊस पडत असतो आणि तो पुढे सरकत असतो त्याच्या मध्ये वेगवेगळ्या शक्यता सुद्धा आहे.

शक्यता अशा आहेत की परतीचा मान्सून असतो तो कधी 24 तास सुद्धा निघून जा तो कधी पाच दिवस सुद्धा राहतो तो कधी दहा दिवस सुद्धा मुक्काम ठोकू शकतो या वेगवेगळ्या शक्यता आहेत.

हे जेव्हा तेव्हा व्यक्त करता येईल असं मत माणिकराव खुळे साहेबांनी व्यक्त केलं आता शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की, सोयाबीन काढणी परतीच्या पावसाच्या कचाट्यात सापडू शकते का..? याच सुद्धा उत्तर माणिकराव खुळे यांनी दिला आहे.

हे वाचा: IMD: आज रात्री राज्यातील या भागात मुसळधार पाऊस..!

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोयाबीनची लागवड केलेली आहे त्या लोकांचा सोयाबीन किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या लोकांनी स्वायबीन लावलेली आहे.

पेरली आहे त्या लोकांचा सोयाबीन हे आक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात आणि तिसऱ्या आठवड्यात काढणीला येईल. म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसरा आठवडा हा सोयाबीनचा काढणीचा महत्त्वाचा काळ ठरू शकतो.

आणि त्याच दरम्यान परतीचा सुद्धा पाऊस येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढतानी काळजी घ्यावी अशी माहिती खुळे यांनी दिली आहे. सध्या पाऊस पडत आहे तो पाऊस परतीचा नसून नैऋत्य मोसमी पाऊस आहे. हा मोसमी पाऊस असल्यामुळे हा हा पाऊस पाच ऑक्टोबर पर्यंत देखील पडू शकतो. असे मत माणिकराव खुळे यांनी मांडले आहे.

Leave a Comment