पहा पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा..! पावसाबद्दल मोठा अंदाज

 panjab dakh हवामान विभागाचे प्रसिद्ध तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात 28 सप्टेंबर, 29 सप्टेंबर, 30 सप्टेंबर व एक‌ ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे.

पंजाबराव डख यांनी पावसाबद्दल केलेले भाकीत

हे वाचा: नोव्हेंबरमधील पावसाबद्दल पंजाबराव डख यांनी स्पष्टच सांगितले; Panjab Dakh Havaman Andaj

1) त्यांच्या माहितीनुसार राज्यामध्ये एक ऑक्टोबर पर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार आहे.

2) सोयाबीन काढण्यासाठी वरून राजा पुन्हा एकदा विश्रांती देणार असल्याचे सुद्धा मोठे भाकीत पंजाबराव यांनी केले आहे.

3) पंजाबराव डख यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातून मान्सून 4 ऑक्टोबर पासून माघार घेणार आहे.

हे वाचा: महाराष्ट्रात इथून पुढे असे राहणार हवामान...! अवकाळी पाऊस पडणार का..? पंजाबराव डख यांनी सांगितले स्पष्ट Panjab Dakh

3) परत पाच ऑक्टोबर नंतर राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. असे पंजाबराव म्हणतात.

4) पंजाबराव यांनी केलेले अंदाज मध्ये असेही नमूद केला आहे. की नवरात्र मध्ये सुद्धा राज्यात चांगला पाऊस पडणार आहे.

28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील या भागात पडणार मुसळधार पाऊस…

हे वाचा: imd: आज पासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात..! पहा कुठे कुठे पडणार

पंजाबराव यांनी दिलेले अंदाज मध्ये 28 सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान कुठे कुठे पाऊस पडणार हे देखील नमूद केले आहे. परंतु त्यांनी हा पाऊस महाराष्ट्रात भाग बदलत पडणार असल्याची माहिती देखील दिली आहे.

ते म्हणतात हा पाऊस सर्वदूर नसून भाग बदलत पडणार आहे. परंतु त्या पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असून राज्यातील ओढून आले एकत्र होण्याची शक्यता आहे. व पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पावसाची सुरुवात राज्यातील मुंबई शहरापासून होणार आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात सुद्धा दमदार पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोकणपट्टी सुद्धा यादरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे.

त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, लातूर, नगर, छत्रपती संभाजी नगर, नांदेड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

त्याचबरोबर अतिवृष्टी सारखा पाऊस होणारे जिल्हे देखील त्यांनी सांगितले आहेत. ते म्हणतात कोल्हापूर जिल्ह्यात एक ऑक्टोबर पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. अतिवृष्टीचा देखील इशारा त्यांनी दिला आहे.

त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. बरोबर सांगली आणि सातारा जिल्ह्याला देखील त्यांनी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  म्हणतात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून नद्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता दाट आहे.

त्याचबरोबर पंजाबराव यांनी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ते म्हणतात राज्यात एक ऑक्टोबर पर्यंत चांगला पाऊस आहे.

व त्यानंतर पाच ऑक्टोबर नंतर हवामान कोरडे राहणार आहे. ते म्हणतात द्राक्ष बागायतदारांसाठी छाटणीसाठी हे वातावरण अतिशय महत्त्वाचे आहे. सोयाबीन काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी एक दिलासादायक बातमी दिली आहे.

पंजाबराव यांचा अंदाजानुसार राज्यात दोन ऑक्टोबर पासून हवामान कोरडे राहणार आहे. व पाच ऑक्टोबर पासून राज्यात कडक ऊन देखील पडणार आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीनंतर एक दिवस वाळून लगेच झाकून ठेवावे.

Leave a Comment