पीएम किसान 15 वा हप्ता मिळवण्यासाठी लवकरात लवकर करा हे 3 कामे..!

शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्ग दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. अशा शेतकऱ्यांना आता पंधरावा हप्ता घेण्यासाठी केंद्र सरकारने नवीन अटी चालू केल्या आहेत. या अटीनुसार शेतकऱ्यांना भू सत्यापन, इ केवायसी, व आधार आणि बँक खाते लिंक ( ekyc, land verification, and bank account linking with Aadhar card) करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना आता पंधरावा हप्ता उचलण्यासाठी ई केवायसी करणे त्या आवश्यक आहे. इ केवायसी ही एक ऑनलाईन प्रक्रिया असून, या प्रक्रियेतून तुमच्या बँक खाते आणि आधार कार्ड चि पडताळणी केली जाते. इ-केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल वरून, किंवा घराजवळ असलेल्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) म्हणजेच सीएससी सेंटर वरून सुद्धा करू शकता.

हे वाचा: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 27500 रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय New Crop insurance list

भू-सत्यापण प्रक्रियेतून तुमच्या जमिनीचा मालकी हक्क(property rights) पडताळला जातो. भू सत्यापन हे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन काढू शकता.

आधार आणि बँक खाते लिंक ही पण एक ऑनलाईन प्रक्रिया असून, ज्यामधून तुमचेआधार कार्ड तुमच्या बँक खात्याला जोडले जाते. ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या बँकेच्या वेबसाईटवर ( पोर्टलवर) जाऊन व एनपीसीआयच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन सुद्धा तुमचे बँक खाते व आधार कार्ड लिंक करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या बँकेची संपर्क साधू देखील शकता.

या तीन अटी केंद्र सरकारकडून लागू करण्यात आले आहेत. जेणेकरून कोणतेही बोगस लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. यापूर्वीच बऱ्याच बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना याचे मोठ्या आर्थिक नुकसान झाले.

हे वाचा: हरभऱ्यावर होतोय घाटेअळीचा प्रादुर्भाव..! घाटेअळीवर अशी करा उपाययोजना infestation of gram borer

शेतकरी मित्रांनो वरील कामे लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून तुम्ही पी एम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्यासाठी पात्र होताल. वरील तीनही कामे पूर्ण करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगल क्रोम वर जाऊन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन देखील माहिती चेक करू शकता.

शेतकरी मित्रांनी जर वरील तीन कामे लवकरात लवकर पूर्ण केली तर त्यांना पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता लवकरात लवकर मिळेल. व आर्थिक मदत देखील होईल.

हे वाचा: सोनालिकाचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च..! मिळणार 80% अनुदानावर

Leave a Comment