पुढील 48 तासात या जिल्ह्यात अति जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट

खूप दिवसाच्या पावसाच्या खंडानंतर अखेर महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे दाखल झाला आहे. राज्याच्या सर्व दूर भागामध्ये एक दिलासा पाऊस झालेला दिसत आहे. तर झालेल्या या पावसामुळे महाराष्ट्रातील काही काही ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. परंतु राज्यात असेही काही भाग आहेत. जिथे अजून सुद्धा शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार, राज्यामध्ये 28 आणि 29 सप्टेंबर दरम्यान सर्व दूर मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील वर्तवण्यात आला आहे.

हे वाचा: पहा पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा..! पावसाबद्दल मोठा अंदाज

या दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. वरील दोन्ही जिल्ह्यांमध्ये 100 mm पेक्षा जास्त पावसाची शक्यता सुद्धा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, व बीड या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. व वरील जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

पालघर, नाशिक, नंदुरबार, जालना, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, परभणी, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे वाचा: पंजाबराव डख यांचा पावसाबद्दल मोठा अंदाज, ऑक्टोबर महिन्यातील या तारखेपासून मुसळधार पाऊस..!

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत पुढील 48 तासानंतर एक नवीन वेदर सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यामध्ये परत एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. दुष्काळसदृश्य झालेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा वरून राज्याच्या आगमनामुळे महाराष्ट्र सुखावला आहे.

Leave a Comment