महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा अंदाज..! ( maharshtra heavy rain)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये एक चक्रीय वारे निर्माण झाले. काही काळातच त्याचे रूपांतर कमी दाबाच्या प्रणालीमध्ये होऊ शकते. व येत्या 24 तासात त्याची तीव्रता वाढून त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतर होऊ शकते.

त्याचबरोबर म्यानमार च्या आसपासच्या परिसरात सुद्धा चक्रीय प्रणालीचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. व येत्या 48 तासात त्याचे देखील रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. व त्याचा मार्ग ओडिषा आणि पश्चिम बंगाल कडे वाल्याचा अंदाज आहे.

हे वाचा: rain update: राज्यातील या भागात आज मुसळधार पावसाचा अलर्ट

या दोन कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. व बऱ्याच भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार देखील पाऊस पडू शकतो.

हवामान खात्याने या काळात शेतकऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांनाही खबरदारी बाळगण्याचे आश्वासन दिले आहे. पावसापासून होणाऱ्या धोका टाळण्यासाठी विजा कडकडत असताना योग्य ठिकाणी आसरा घ्यावा.

व शेतकऱ्यांनी आभाळाकडे बघूनच कामे करावी. आपल्या गुराढोरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे अशे आश्वासन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

हे वाचा: अखेर महाराष्ट्रातील या भागात मुसळधार पावसाला सुरुवात..! पहा तुमच्या इकडे कधी पडणार

हवामान विभागाने आज प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. व त्याचबरोबर कोकण आणि मध्य महाराष्ट्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी मुसळधार ते‌ अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. व या जिल्ह्यांना ऑरेंज कलर देखील जारी करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे कोकणातील रायगड आणि सातारा या जिल्ह्यासाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

हे वाचा: IMD: आज रात्री राज्यातील या भागात मुसळधार पाऊस..!

महाराष्ट्रातील अहमदनगर, ठाणे, पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभाग कडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 28 आणि 29 सप्टेंबर दरम्यान कोकणात 115.6 ते 204.4 मि मिपाऊस पडण्याची शक्यता आहे. व त्याचबरोबर हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. जिल्ह्यामध्ये देखील 29 आणि 30 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment