या जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर पिक विमा मंजूर..! pik vima

महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पावसाच्या खंडामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान भरपाई करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये 25 टक्के पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. pik vima

याविषयीचे अधिक सूचना नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहे. यांच्या या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात चार नंबरचा आणि सहा नंबरचा ट्रिगर लागू होतो.

हे वाचा: नुकसान भरपाई ची मदत मिळवण्यासाठी करा हे काम..! नाही केल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही.. Nuksan Anudan Yojana

चार नंबरचा ट्रिगर म्हणजे पर्जन्यमानातील बदल, सहा नंबरचा ट्रिगर म्हणजे नैसर्गिक आपत्ती जसे की अतिवृष्टी, परिस्थिती यामुळे तेथील क्षेत्रातील पंचवीस टक्के पेक्षा अधिक क्षेत्र बाधित होते.

हे दोन्ही ट्रिगर लक्षात घेता. नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये 25% अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर झालेल्या विमा क्षेत्रात सोयाबीन, कापूस, तुर आणि खरीप ज्वारी या पिकांकरिता केलेल्या सर्वेक्षणात गेल्या सात वर्षाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा 50% घट दिसून आली.

याच पार्श्वभूमीवर त्या क्षेत्रातील सोयाबीन, कापूस, तुर, खरीप ज्वारी या पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या पंचवीस टक्के आगाव रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आली. (nanded)

हे वाचा: नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता जाहीर यादिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रु.पहा यादी | Namo Shetkari

ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी पुणे यांना आदेशित करण्यात आलेले आहे.या आदेशामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी राजा सुखावला आहे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळण्याची अपेक्षा देखील आहे.

Leave a Comment