रब्बी ज्वारी पेरताय, करा या वाणाची लागवड व मिळवा मोठ्या प्रमाणात उत्पादन..!

महाराष्ट्रमध्ये ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळेच महाराष्ट्राला ज्वारीचे प्रमुख उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये रब्बी आणि कधी खरीप हंगामातही ज्वारी पेरली जाते.

आता खरीप हंगाम तर संपला आता रब्बी हंगामासाठी बरेच शेतकरी बांधव ज्वारी पेरणीसाठी तयारी करत आहेत. त्यासाठीच ज्वारीचे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळण्यासाठी महाराष्ट्रातील महात्मा फुले विद्यापीठाने जमीनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुरक्षित वाण विकसित केले आहे.  या सुधारित वाणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या ज्वारीच्या उत्पादनात 25% ची वाढ झाल्याचे आढळून आले आहे. तर चला जाणून घेऊया वानांची नावे व माहिती

हे वाचा: महाराष्ट्रात होणार दुष्काळ जाहीर..? पहा धनंजय मुंडे यांच मोठ भाकीत

जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हलक्या जमिनीवर ज्वारीची लागवड करायची असेल तर खालील वानाचा उपयोग करा. जेणेकरून तुम्हाला उत्पादनातही वाढ पाहायला मिळेल.

1) फुले अनुराधा:  हे ज्वारीचे वाण हलक्या जमिनीत लागवडीस योग्य आहे. हे वाण काढणीसाठी तब्बल 105 ते 110 दिवसानंतर येते. हलक्या जमिनीवर या वानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या वाणाची भाकरीची आणि कडब्याची प्रत सुद्धा उत्तम आहे. कोरडवाहू जमिनीवर या वाणाचे धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्टर 8 ते 10 क्विंटल आणि कडबा 30 ते 35 क्विंटल मिळते.

2) फुले सुचित्रा:  या वानाची लागवड मध्यम जमिनीवर केल्यास या वानातून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकते. हे वान काढण्यासाठी येण्यासाठी 120 ते 125 दिवसाचा कालावधी लागतो. या वाणाचे दाणे मोत्यासारखे शुभ्र पांढरे असतात. व त्याचबरोबर भाकरीची आणि कडब्याची प्रत सुद्धा उत्तम आहे. या वाणाची लागवड केल्यानंतर यातून धान्य उत्पादन प्रती हेक्टर 13 ते 15 क्विंटल आणि कडबा उत्पादन 45 ते 50 क्विंटल इथपर्यंत मिळते.

हे वाचा: एकापेक्षा जास्त बँक खाती असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, RBI चा नवीन नियम काय म्हणतो ते जाणून घ्या Multiple Bank Accounts

जड जमिनीवर लागवड करायचे वाण

3) फुले वसुधा:  या वाणाची लागवड जड जमिनीवर केल्यानंतर, यामधून चांगल्या प्रमाणात उत्पादन मिळू शकते. या जातीचे वाण काढणीसाठी येण्यासाठी 130 ते 135 दिवसाचा कालावधी लागतो. या वाणाचे दाणे सुद्धा मोत्यासारखे शुभ्र असतात.

आणि भाकरी व कडब्यासाठी याची प्रत सुद्धा उत्तम आहे. या वाणाचे सरासरी धान्य उत्पादन हे प्रती हेक्टर 14 ते 16 क्विंटल आणि कडबा उत्पादन हे 48 ते 52 क्विंटल मिळते.

हे वाचा: या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित..!

शेतकऱ्यांनी जर वरील ज्वारी वाणाची लागवड रब्बी हंगामासाठी केली तर नक्कीच त्यांना चांगले उत्पादन मिळेल. आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न देखील वाढेल.शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना सुधारित वानांची लागवड करताना योग्य त्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. व खत आणि पाण्याचे योग्य प्रमाणातच व्यवस्थापन करावे.

Leave a Comment