रब्बी पिक विमा 2022 वितरणाचा मार्ग मोकळा..! शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

2022 मधील रब्बी पिक विमा च्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने रब्बी हंगाम 2022-2023 साठी राज्य शासनाच्या हिताचा उर्वरित अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. pik vima

या योजनेअंतर्गत एकूण 25 कोटी 55 लाख 49 हजार 22 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात पाच कंपन्यांच्या माध्यमातून रब्बी पिक विमा राबवण्यात आला होता.

हे वाचा: दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांमध्ये मिळणार ३ हेक्टर पर्यंत आर्थिक मदत..! Drought declared

या कंपन्यांनी शासनाकडे अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार, एचडीएफसी आरगो जनरल इन्शुरन्स कंपनीला 3 कोटी 58 लाख 35 हजार 722 रुपये, आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनीला 5 कोटी 24 लाख 83 हजार 672 रुपये आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला 16 कोटी 72 लाख 29 हजार 628 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिक नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते. या योजनेसाठी शेतकऱ्यांना फक्त 1.5 टक्के विमा हप्ता भरावा लागतो. उर्वरित हप्ता केंद्र आणि राज्य सरकाराकडून दिला जातो.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा रब्बी पिक विमा मंजूर झाला आहे, परंतु त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांना आता कंपनीकडे विचारणा करून पाठपुरावा करता येईल.

हे वाचा: रब्बी हंगामात देखील 1 रुपयातच पिक विमा; असा करा अर्ज Rabi Crop Insurance

Leave a Comment