रब्बी बियाणे अनुदान योजना..! असा करा ऑनलाईन अर्ज

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सध्या रब्बी हंगामासाठी अनुदानित बियाणे वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अनुदानित बियाणे वाटप करणे हे एक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा भाग आहे. या अभियानांतर्गत रब्बी हंगामासाठी व खरीप हंगामासाठी अनुदानित बियाणे वाटप करून शेतकऱ्यांना मदत केली जाते.

हे वाचा: pik vima: फळबाग पिक विमा आला; 2023 साठी होणारी इतकी रक्कम वितरित..!

या अभियानांतर्गत दोन प्रकारच्या बियाणेअर्ज स्वीकारले जातात. त्यामध्ये पहिला म्हणजे प्रात्यक्षिक पीक आणि दुसरा म्हणजे प्रामाणिक बियाणे वितरण. ज्वारी, हरभरा, मका आणि जवस या पिकांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा द्वारे अनुदान वाटप केले जाईल.

ज्या शेतकऱ्यांना हे बियाणे पाहिजे आहे. अशा शेतकऱ्यांनी 20 ऑक्टोबर पूर्वीच महाडीबीटी फार्मर वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. याची निवड प्रक्रिया लॉटरी पद्धतीने केली जाते.  तर शेतकरी मित्रांनी वेळ न घालवता ऑनलाईन अर्ज करावा. अनुदानित बियाणांचा लाभ मिळवावा.

अशाप्रकारे करा अर्ज:

हे वाचा: दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांमध्ये मिळणार ३ हेक्टर पर्यंत आर्थिक मदत..! Drought declared

1. महाडीबीटी फार्मर वेबसाईटवर लोगिन करा

2‌. अनुदानित बियाणे वाटप या बटनावर क्लिक करा.

3. जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमची सर्व माहिती भरा. ( अर्जदाराची माहिती)

हे वाचा: शेतकऱ्यांनो या यादीत नाव असलं तरच मिळणार नमो शेतकरी चा पहिला हप्ता; namo shetkari list

4. बियाण्याची पिक आणि प्रमाण निवडा.

5. अर्ज सबमिट करा

अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणताही शुल्क भरण्याची गरज नाही. हे अगदी मोफत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अनुदानित बियाणांचा लाभ घ्यावा.

Leave a Comment