राज्यात पुन्हा पाऊस वाढणार..! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

कालपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या बुधवारपर्यंत असाच पाऊस राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागात आणखीन पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ज्याचा विस्तार ईशान्य मध्य प्रदेश पासून ते बिहार पर्यंत आहे.

हे वाचा: दक्षिणेकडील राज्यामध्ये बरसतोय, मुसळधार पाऊस..! महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस पडणार का..? panjab dakh

त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात 26 सप्टेंबर नंतर अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात 24, 25, आणि 26 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज राज्यात विविध भागात विजांच्या कडकडाटसह पाऊस पडेल. अशी माहिती हवामान विभाग दिली आहे. त्याचबरोबर गोवा आणि कोकण या भागापर्यंत 24 ते 29 सप्टेंबर पर्यंत पाऊस राहील. त्यानंतर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या कालावधीत चांगला पाऊस पडेल.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, कोल्हापूर, बीड, नंदुरबार, सातारा, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, जालना, हिंगोली, रायगड या जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज सुद्धा हवामान विभागाने वर्तवला आहे.

हे वाचा: राज्यावर 2 चक्रीवादळांचे मोठे संकट, सोयाबीन भिजणार..? या जिल्ह्यांना हाय अलर्ट cyclone in maharsahtra

बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यात पुढील काही दिवस असेच पावसाचे वातावरण राहण्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्याचबरोबर पुण्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातील परभणी, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना त्याचबरोबर पुणे, सातारा, नाशिक, जळगाव, या जिल्ह्यांना देखील येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण विभागातील रायगड रत्नागिरी ठाणे या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो.

हे वाचा: Panjabrao dakh: परतीच्या पावसाबद्दल पंजाबराव डख यांचं मोठं भाकीत..! वाचा सविस्तर

Leave a Comment