राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय..! राज्यातील या भागात ऑरेंज अलर्ट जारी

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. राज्यात आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील अनेक भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाने राज्यातील काही भागात भरण्यास सुरुवात केली होती. परंतु राज्यातील उरलेल्या भागात पावसाची चाहूल देखील नाही.

हे वाचा: ऑक्टोबर महिन्यातील पावसाबद्दल पंजाबराव डख यांच‌ मोठ भाकीत..!

परंतु आज पासून राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होऊन तो बऱ्याच ठिकाणी बरसू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. येत्या पाच दिवसात राज्यातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.

तर विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून महाराष्ट्रात पुन्हा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

काल म्हणजेच चार सप्टेंबर रोजी राज्यातील चंद्रपूर नाशिक या ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे वाचा: आज पासून राज्यात वाढणार पावसाचा जोर..! हवामान खात्याची मोठी अपडेट

बंगालच्या उपसागरात चक्रीय वारे तयार होत आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन. पुढील चार ते पाच दिवसात पुणे परिसरात पाऊस कायम राहणार आहे. पुणे घाट परिसरात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

Leave a Comment