शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान…!

Wire fence: शेतकरी मित्र कष्टाने त्यांची शेती करतात, परंतु जंगली प्राणी व पाळीव प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तोंडी आलेला घास हिसकावून घेतला जातो. या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी वर्षभर केलेली मेहनत.

गाळलेला घाम वाया जातो. शेतकऱ्यांमधील व जंगली प्राण्यांमधील होणारी मुदभेड टाळण्यासाठी शासनाद्वारे तार कुंपण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतीला तार कुंपण बसवण्यासाठी 90% अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

हे वाचा: पीक नुकसानीपोटी जिरायती साठी 13600 तर बागायतीसाठी 27000 हजार रुपये मंजूर..! due to crop damage

या योजनेचा एवढाच उद्देश आहे की, वन्य प्राण्याकडून होणारी शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान टाळण्यासाठी व शेतकऱ्यांमधील आणि वन्यजीव यामधील संघर्ष टाळण्यासाठी ही योजना सरकारद्वारे अमलात आणल्या गेली. या योजनेतून शेतकऱ्यांना चांगली उत्पादन मिळण्यासाठी देखील मदत होईल.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे…!

या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, सातबारा उतारा, शेत जमीन मालकीचा पुरावा, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, बँक खाते पासबुक या योजनेचा अर्ज संबंधित जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अर्ज करायचा आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने देखील करता येतो.

हे वाचा: पुढील 4 दिवसात उरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा होणार जमा Pik Vima Yojana

या योजनेसाठी पात्र झाल्यास खालील फायदे होतील.

1) या योजनेसाठी शेतकरी बांधव पात्र झाल्यास त्यांना तार कुंपण लावून त्यांच्या शेती पिकांचे वन्य प्राण्यापासून संरक्षण करता येते.

2) त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची कमी नुकसान होईल, व उत्पन्न चांगले मिळेल शेतकऱ्यांना तार कुंपण लावण्यासाठी एकूण लागलेल्या खर्चापैकी 90 टक्के खर्च सरकार देणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी या योजनेसाठी अर्ज करावा.

हे वाचा: या 32 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पिक विमा जमा Toady Crop Insurance Credit

Leave a Comment