शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये; केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ

राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यामध्येच एक योजनेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

पंतप्रधान किसान सन्मान निधि योजना

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना 'नमोचा' पहिला हप्ता 4 दिवसात..!! namo shetkari yojana

पंतप्रधान किसान सन्मान योजना म्हणजेच पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाकाठी सहा हजार रुपये जमा केले जातात. पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार मिळाल्यामुळे मोठा आधार मिळतो.

या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यांमध्ये जमा केले जातात. प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान या योजनेचा 15 हप्ता देखील जमा होईल.

आता पीएम किसान सन्मान निधी योजना बरोबरच नमो शेतकरी महा सन्मान योजना देखील राज्य सरकार द्वारे चालू करण्यात आली आहे. आत्ता या योजना अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात Crop insurance latest

पी एम किसान निधी योजनेचे सहा हजार रुपये व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. जुलै महिन्यात 27 तारखेला पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.

पी एम किसान मानधन योजना..!

पी एम किसान योजनेबरोबरच आता पी एम किसान मानधन योजना सुद्धा केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांच्या खात्याचा प्रत्येक वर्षी तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ; पहा यादी loan waiver

या योजनेचा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभ घेता यावा म्हणून या योजनेविषयी माहिती या लेखात देण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ 18 ते 40 वयोगटातील शेतकरी मोठ्या प्रमाणात येऊ शकतात.

ज्यावेळेस शेतकरी 60 वर्षाच्या समोर धकतो त्यावेळेस त्याला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये देण्यात येतात. या योजनेचा लाभ फक्त दोन एकर पेक्षा कमी शेत असणाऱ्यांनाच मिळणार आहे.

पंतप्रधान पिक विमा योजना..!

पंतप्रधान पिक विमा योजना ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या पिकावर नैसर्गिक आपत्ती जसे की किड्यांचा प्रादुर्भाव वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाला किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले.

अशा वेळेस या योजना अंतर्गत पिकांना संरक्षण देण्यात येते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळते. पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत राज्य सरकार आणि केंद्र सरकार 50% प्रीमियम सबसिडी शेअर करत असतात. वरील या तीन योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ घेता येतो

Leave a Comment