दहावी बारावी बोर्ड परीक्षाचे वेळापत्रक जाहीर..! पहा आपल्या मोबाईलवर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 12 वी च्या लेखी परीक्षा ह्या 21 फेब्रुवारी ते 24 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहेत.

तर इयत्ता 10 बोर्ड लेखी परीक्षा ह्या 1 मार्चपासून ते 22 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहेत. ही माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे याद्वारे 28 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली आहे.

हे वाचा: अखेर दुसऱ्या टप्प्यात 25% अग्रीम पिक विमा जमा करण्यास सुरुवात..! या शेतकऱ्यांच्या खात्यावर झाला जमा Advance crop insurance

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना नियोजित मदत मिळण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा ताण कमी होण्यासाठी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्याद्वारे संभाव्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Maharshtra board exam date 2024 

बोर्डाच्या अधिकृत पोर्टलवर ( वेबसाईटवर) परीक्षांचे संभाव वेळा पत्रक हे प्रामुख्याने माहितीचे काम करते. बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक हे लेखी स्वरुपात महाविद्यालय व शाळांमध्ये वितरित केले जाते.

हे वाचा: Onion Farming: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! सरकारने शेतकऱ्यांची...

प्रत्येक परीक्षेच्या अगोदर प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक परीक्षांच्या विविध श्रेणी, तोंडी परीक्षा इतर विषयांची माहिती बोर्ड शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देईल.

व या वेळापत्रका विषयी असणाऱ्या समस्या व टिपण्या विभागीय मंडळ आणि राज्य मंडळाकडे पंधरा दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर कोणतीही कल्पना विचारात घेतली जाणार नाही. असे मत ओक यांनी स्पष्ट केले आहे.

10th 12th board exam time table date download

हे वाचा: 2023 साठीची खरीप हंगामी पैसेवारी जाहिर..!

दहावी बोर्ड परीक्षा व बारावी बोर्ड परीक्षा सध्याच्या चालू पद्धतीने नुसारच घेतल्या जातील. याची जाणीव सर्व शाळा महाविद्यालय तसेच पालक व विद्यार्थ्यांनी ठेवावी. असे देखील या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

Timetable Name Download link
१२वीचे वेळापत्रक इथे क्लीक करा
10वीचे वेळापत्रक

पोर्टल वर दिलेल्या टाईम टेबल सुविधा ही केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने आहे. परीक्षांचे अंतिम वेळापत्रक हे शाळा, महाविद्यालय, व उच्च विद्यालय यामध्ये परीक्षा पूर्वी छापील स्वरूपात वितरित केले जाईल.

Leave a Comment