या जिल्ह्यातील 160 गावांना मिळणार अग्रीम पिक विमा..! वाचा सविस्तर

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात सर्व मंडळात पावसाचा खंड पडल्यामुळे तेथे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जालना जिल्ह्यातील आठ महसूल मंडळे अग्रीम पिक विमा साठी पात्र ठरली आहेत.

जालन्याचे जिल्हाधिकारी यांनी अशी घोषणा केली आहे. या आठ मंडळातील एकूण 160 गावांना अग्रीम पिक विमा मिळणार आहे. व याबाबत अधिसूचना देखील जारी करण्यात येतील.

हे वाचा: गट नंबर टाकून मिळवा आपल्या शेत जमिनीचा नकाशा घरी बसल्या..! Land map

पावसाअभावी झालेले शेती पिकाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी कार्यालयात बैठक झाली. सर्व पाहणीचा अहवाल घेतल्यानंतर हा अहवाल राज्य सरकारला प्रदान केला जाईल.

असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेया मंडळामध्ये एकूण 21 दिवस पावसाचा खंड होता. त्यामुळे या मंडळामध्ये पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आठ मंडळातील पात्र असलेली गावे पुढील प्रमाणे..

जालना शहर, रामनगर, सातोना खुर्द, बदनापूर, पाचनवडगाव, दाभाडी, रोशनगाव, राणी उंचेगाव या गावाचा समावेश आहे अशी माहिती जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

हे वाचा: अखेर कांदा अनुदान वाटप सुरू..! शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार इतकी रक्कम

या पात्र गावांना आर्थिक नुकसान भरपाई म्हणून पंचवीस टक्के आगाऊ पिक विमा रक्कम मिळेल. पुढच्या आठ दिवसात कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. या महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त काळ पावसाचा खंड असल्यामुळे हे सर्व आगाऊ पिकविण्यासाठी पात्र आहेत. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली

Leave a Comment