या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजना अंतर्गत 2000 रुपये..!! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्र मध्ये झालेल्या आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये, शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे.

त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा दिवाळीच्या अगोदर पर्यंत जमा होईल. त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्तासाठी राज्य सरकार द्वारे 1720 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.

हे वाचा: या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विम्याचे 39600 रुपये crop insurance

नमो शेतकरी महा सन्मान योजना..!! Namo shetkari

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्याप्रमाणे पीएम किसान निधी योजना सुरू करण्यात आली. त्याच प्रकारे राज्य सरकारने विचार करून महा सन्मान नीधी योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी व आर्थिक मदतीसाठी सुरू केली.

ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये वितरित केले जातात. त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना अंतर्गत सुद्धा 6 हजार रुपये वितरित केले जाणार आहेत. असे मिळून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून बारा हजार रुपयांची मदत होणार आहे.

हे वाचा: राज्यातील या तालुक्यांचे दुष्काळ यादीतून नाव वगळले..! New Dushkal Nidhi Anudan List

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महा सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी जमा केला जाईल. व या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1 हजार 720 कोटी रुपये निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. Namo shetkari Yojana

Leave a Comment