बापरे..! 6 एकरातून कमावले तब्बल 90 लाख रुपये

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील प्रताप लेंडवे हे एक यशस्वी केळी उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी केळी उत्पादनातून फक्त नऊ महिन्यातच 90 लाख रुपये कमावले. प्रताप लेंडवे यांचे वडील सुद्धा बागायत शेतकरीच होते.

प्रताप लेंडवे हे लहानपणापासून शेतातील कामे करतात. सुरुवातीच्या काळात त्यांनी डाळिंबाची शेती केली. परंतु त्यांना त्यातून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजेच नफा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी डाळिंबाच्या शेतीचे रूपांतर केळी शेतीमध्ये केले.

हे वाचा: दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 16000 रूपये..! पहा यादीत नाव

प्रताप लेंडवे यांना केळीच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात ज्ञान असल्यामुळे, व इंटरनेटवर असलेले पुस्तक किंवा असल्यामुळे त्याचबरोबर मोठा मोठा केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतलेल्या मार्गदर्शनामुळे प्रताप लेंडवे यांनी सहा एकरामध्ये तब्बल 90 लाख रुपयाचे उत्पादन काढले आहे.

प्रताप लेंडवे यांनी ऐकून 6 एकरात केळीची लागवड केली होती. योग्य पद्धतीची लागवड व पाण्याचा स्त्रोत असल्यामुळे. त्यांना त्यातून चांगले उत्पादन मिळाले. त्यांच्या शेतातील केळीचा दर्जा सुद्धा चांगला असल्यामुळे त्यांच्या केळीचे आवक जम्मू-काश्मीरमध्ये केली जाते.

प्रताप लेंडवे हे जम्मू काश्मीर मधल्या व्यापाऱ्यांना 35 रुपये किलो प्रमाणे केळी देतात त्यामुळे त्यांना चांगला नफा होतो. प्रताप लेंडवे यांची कहाणी शेतकऱ्यांसाठी मोठी प्रेरणादायी असून. दाखवून दिले आहे की योग्य प्रकारची शेती केल्यास शेतीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवता येते.

हे वाचा: 1 एकर जमिनीतून कमवा महिन्याला 2 लाख रुपये; ते सुद्धा कमी खर्चात Profitable Farming

Leave a Comment