राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार नुकसान भरपाई

नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव म्हणजे NDRF या योजनेमध्ये विविध नैसर्गिक आपत्तींचा समावेश करण्यात आलेला आहे.

यामध्ये पिकावरील होणारा पेस्ट अटॅक राज्यातील विविध भागांमध्ये गोगलगायीमुळे होणारे पिकाचे नुकसान किंवा मोझाक व्हायरस चा होणारा प्रादुर्भाव त्याच्यामुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

हे वाचा: पहा येत्या 24 तासात राज्यातील या भागात जोरदार पाऊस

अशाप्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर त्यांना आर्थिक मदत व नुकसान भरपाई या NDRF च्या नवीन धोरणानुसार करण्यात आलेली आहे. आता हे नवीन धोरण राज्य शासन स्वीकारणार आहे.

आणि याच्यासाठी 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार जर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालं, तर त्याच्यासाठी जिराफ क्षेत्रासाठी 8500 प्रति हेक्टर तर फळबाग वार्षिक पिकांचे नुकसान झालं तर 22500 प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आली आहे.

यापूर्वी 2022 मध्ये राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे त्यामध्ये सततचा पाऊस असेल अतिवृष्टी व पूर परिस्थिती अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

हे वाचा: महाराष्ट्रातील तुर बाजार भाव 4 सप्टेंबर 2023

गोगलगायी मुळे सुद्धा काही भागात मोठे नुकसान झाले होते. राज्यातील जळगाव जिल्ह्यातील केळी पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर नवीन लग्न केलेल्या केळी पिकावर कुकुंबर मोजक व्हायरस याचा प्रभाव दिसून आला होता.

आणि यामुळे जळगाव जिल्ह्यातील 275 गावातील जवळजवळ 15663 शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ हजार पाचशे प्रति हेक्टर रुपये जमा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याचा जीआर 5 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार प्रति हेक्टर 22500 जास्तीत जास्त क्षेत्र हे दोन हेक्टर गृहीत धरण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना याच्या अगोदर नुकसान भरपाई मिळाली आहे अशी शेतकरी वगळून बाकी सर्व शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळणार आहे.

हे वाचा: यावर्षी परतीचा पाऊस कमीच रामचंद्र साबळे

Leave a Comment