दुष्काळ जाहीर करण्याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच मोठे विधान

महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या तब्बल 21 दिवसाच्या पावसाचा खंडानंतर शुक्रवारपासून हळूहळू पावसाला सुरुवात होऊ लागली. परंतु 11 सप्टेंबर नंतर परत पावसाने उघडीप दिली आहे.

7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर यादरम्यान महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस झाला. शेतकऱ्यांना ज्या पावसाच्या अपेक्षा होती. तसा पाऊस झाला नाही.

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजार भाव 10 सप्टेंबर 2023

अशातच शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठे वक्तव्य केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

वेळ पडल्यास लगेच दुष्काळ जाहीर केला जाईल. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये पिक विम्या चा प्रश्न मार्गी लागेल. त्याचंबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न मार्गी लागेल.

व केंद्राचे आणि राज्याचे अनुदान एकाच टप्प्यात शेतकऱ्यांना देता येईल का याचाही विचार केला जाईल असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. त्यांनी मीडियाशी बोलताना म्हटले आहे की, जरी सप्टेंबर मध्ये काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी ऑगस्ट महिन्यातील खंड भरून निघणे शक्य नाही.

हे वाचा: कापुस बाजार भावात तेजी..! यावर्षी मिळणार कापसाला सर्वाधिक भाव

त्या खंडामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत. याबाबतचे निर्णय महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवले आहेत. लवकरच त्यावर मार्ग निघेल असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. व राज्य सरकार सुद्धा यावरील निर्णय येणाऱ्या सोळा तारखेपर्यंत घेईल.

Leave a Comment