शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज..!

शेततळे अस्तरीकरण एक शाश्वत योजना असून, या योजनेसाठी एकूण 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजने करिता 2022-23 कालखंडासाठी 101 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. Field lining

 शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार द्वारे व राज्य सरकार द्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि फायद्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक योजना म्हणजे शेततळे अस्तरीकरण,

हे वाचा: या 20 जिल्ह्यामध्ये सौर पंपासाठी अर्ज भरण्यास झाली सुरुवात Kusum Solar Pump Yojana

हि योजना म्हणजे शेतकऱ्यांना शेततळ्याचे प्लास्टिक फिल्मच्या साह्याने अस्तरीकरण करण्यासाठी शासनाकडून 50% अनुदान दिले जाते. हे अनुदान जास्तीत जास्त 75 हजार रुपये पर्यंतच मर्यादित आहे. या योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या अंतर्गत दिले जाते.

या योजनेसाठी जे शेतकरी इच्छुक आहेत अशा शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. असे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या योजनेला 2022-23 मध्ये राबविण्यासाठी मंजुरी देखील मिळाली आहे.

वरील प्रकल्प हा एक वर्षाच्या कालखंडामध्ये राबविण्यात येणार आहे. व या प्रकल्पासाठी 51 कोटी रुपये निधी वाटप करण्यात येत आहे. सदर निधी वाटपामध्ये वाढ किंवा घट करण्याचा संपूर्ण अधिकार महाराष्ट्र शासनाकडे राहणार आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! नुकसान भरपाईसाठी शासनाकडून 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर Crop Insurance update

या निधी वाटपामध्ये केंद्र शासनाचा निधी 60% असणार आहे. आणि राज्य शासनाचा निधी हा 40% असणार आहे. हा सर्व मिळून 51 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना या निधी समन्वयक वाटप करण्यात येणार आहे.

शेततळे अस्तरीकरण करण्यासाठी अनुदान किती..? Field lining

वरील माहितीत आपण पाहिलेच आहे. की, शेततळे अस्तरीकरण करण्यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त अनुदान 75 हजार रुपये पर्यंत दिली जाते. वयासाठी 51 कोटी रुपये निधी एवढा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर चला जाणून घेऊया सविस्तर

हे वाचा: तारीख फिक्स..! या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता installment of Namo Shetkari

अस्तरीकरणाच्या आकार आणि अनुदानासाठीचे निकष

आकार (मीटर) अनुदान (रुपये)
30 × 30 × 3 75,000
30 × 25 × 3 67,728
25 × 25 × 3 58,700
25 × 20 × 3 49,671
20 × 20 × 3 41,218
20 × 15 × 3 31,598
15 × 15 × 3 28,275

शेततळे अस्तरीकरण योजना महाराष्ट्र राज्य

या योजनेचा अर्ज करण्यासाठी, शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन म्हणजेच वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो, व अर्ज केल्यानंतर या योजनेसाठी लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाते.

शेततळे अस्तरीकरण योजनेमध्ये शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर, पूर्व संमती पत्र, व आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावी लागतात. व त्यानंतर कृषी सहाय्यक, कृषि अधिकारी यांच्यामार्फत जिओ टॅगिंग द्वारे स्थळ तपासणी केली जाते. त्यानंतर अनुदानाची रक्कम आधार सलग्न बँक खात्यावर जमा केली जाते.

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड
2. बँक पासबुक
3. जमिनीचा सातबारा व 8 अ उतारा
4. पूर्वसंमती पत्र. इतर मंजुरी कागदपत्रे

Leave a Comment