पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा..! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय crop loans

crop loans: दुष्काळ आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पीक कर्जाच्या परतफेडीची स्थगिती जाहीर केली आहे.

सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना ही सवलत दिली आहे. याशिवाय इतर 1021 तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांनाही हीच स्थगिती लागू करण्यात येणार आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! महावितरण देणार दिवसा वीज त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेत जमिनीचे 50000 हजार भाडे Solar Project

या स्थगितीनुसार शेतकऱ्यांना खालील सवलती मिळतील:

  1. जमीन महसूल सवलत
  2. सहकारी कर्ज पुनर्गठन
  3. शेतीशी संबंधित कर्ज वसुलीला स्थगिती
  4. कृषी वीज बिलात 33.5% सवलत
  5. शाळा-महाविद्यालयीन शुल्क माफी
  6. रोहयो कामाचे निकष शिथिल
  7. पाणीटंचाईसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा
  8. शेती पंपाची वीज खंडित न करणे

या सवलतींचा आर्थिक भार त्या त्या विभागांना उचलावा लागेल असे सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय 40 तालुक्यांमध्ये तर 1021 तालुक्यांमधील काही गावांमध्ये ही स्थगिती लागू करण्यात येणार आहे. त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, नाशिक, पुणे, शिरूर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली इत्यादी जिल्हे आहेत.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! ही बँक देणार शेतकऱ्यांना 7 लाखापर्यंत चे कर्ज loans

Leave a Comment