कापुस बाजार भावात तेजी..! यावर्षी मिळणार कापसाला सर्वाधिक भाव

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. गेल्या वर्षी कापसाला पाहिजे तेवढा भाव न मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजगी होती. परंतु आता यावर्षी कापसाची घट जागतिक स्तरावर होणार आहे.

आताच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या भावात लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. आणि त्याचबरोबर वायदे बाजारातही बाजार भाव वाढलेला दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापूस बाजार भावात वाढ झाल्याने देशातील वायद्यातही वाढ झाली आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यात आज रात्री पडणार धो धो पाऊस

परंतु आवक जावक कमी झाल्यामुळे बाजारपेठा स्थिर झाल्या आहेत. इंटरकॉन डिटेल एक्सचेंज ने कापसाचे दर 90 सेंट प्रति पौंड यासह आंतरराष्ट्रीय कापूस वायदे यातील उच्चांक गाठली आहे.

जगातील अमेरिका आणि चीन दोन्ही देशात यावर्षी कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. येथील उष्णता, पूर , ढगफुटी यामुळे तेथील कापूस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आयात मध्ये वाढ होऊन कापसाची मुबलक प्रमाणात त्या देशात आवक होऊ शकते.

भारतातील बाजार समितीमध्ये सध्याचा कापूस दर हा 7000 ते 8000 रुपये प्रतिक्विंटल दराने आहे. व तोच वायदे बाजार भाव 61 हजार 800 रुपयावर पोहोचला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील टोमॅटो बाजार भाव 4 सप्टेंबर 2023

यंदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या उत्पादनात घट झाल्यावर कापूस सरासरी दहा हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला जाण्याची शक्यता कापूस तज्ञांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment