havaman andaj: राज्यात या तारखेपासून वादळी पावसाची शक्यता..! नवीन हवामान अंदाज 18 सप्टेंबर 2023

सध्याच्या काळात सर्व शेतकरी मित्र पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पोळा झाल्यानंतर दोन दिवस बऱ्याच ठिकाणी तुरळक प्रमाणात तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण होते.

आज 18 सप्टेंबर रोजी हवामानात एकदम बदल होऊन कडाक्याचे ऊन पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता होत आहे की आता पाऊस पडणार की नाही. हीच चिंता दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी पावसाबद्दल नवीन हवामान अंदाज घेऊन आलो आहोत. तर चला पाहूया आजचा नवीन हवामान अंदाज या लेखात.

हे वाचा: नोव्हेंबर महिन्यात असे राहणार हवामान..! पहाच एकदा अंदाज weather update

बंगालच्या खाडीत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा विरळला आहे. म्हणजेच त्याचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात संपूर्ण वातावरण स्थिर झाले आहे. बुधवार दिनांक 20 सप्टेंबर पर्यंत राज्यात असेच स्थिर वातावरण राहील. ढगाळ वातावरण कमी झाल्यामुळे तापमानात सुद्धा वाढ होईल.

अशीच स्थिती राज्यांमध्ये बुधवारपर्यंत राहणार आहे. 21 सप्टेंबर पासून म्हणजेच गुरुवारपासून राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात म्हणजेच दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राज्यामध्ये आहे.

अशी परिस्थिती 24 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच रविवार पर्यंत राहणार आहे. मात्र नेमका हा पाऊस कुठे पडेल त्याचे स्थान सांगणे कठीण आहे. मान्सूनच्या राहिलेल्या काळात म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत कोणताच कमी दाबाचा पट्टा अपेक्षित नाही. त्यामुळे मोठा व दिवसभर चालणाऱ्या मुसळधार पावसाची शक्यता तरी 30 सप्टेंबर पर्यंत नाही.

हे वाचा: IMD: राज्यातील या 5 जिल्हात मुसळधार पाऊस heavy rain in maharashtra

राज्यामध्ये येत्या गुरुवारपासून ते रविवार पर्यंत विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतरचा वादळी पाऊस तुरळीक ठिकाणी पडू शकतो. पावसाळ्याचा कालावधी हा 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत म्हणजे चार महिने असतो.

जरी इथून पुढे 30 सप्टेंबर पर्यंत जर आपण पाहिलं तर कोणत्याच भागात कमी पट्टा तयार होणार असे अपेक्षित नाही. त्यामुळे काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात तर काही ठिकाणी पावसाची उघडीप राहू शकते. ज्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांची फवारणी करायची आहे. अशांनी सोमवार ते बुधवार या कालावधीमध्ये फवारणी करून घ्यावी.

हे वाचा: राज्यात या तारखेपासून होणार मुसळधार पावसाला सुरुवात..! पहा नवीन अपडेट

Leave a Comment