कापूस पोळा अमावस्या फवारणी..! पातेगळ थांबवण्यासाठी फवारणी

शेतकरी मित्रांनो आता कालच पोळा अमावस्या झाली. बरेच शेतकरी पोळा अमावस्या झाल्यानंतर आपल्या कापूस पिकांची फवारणी करतात. पोळा अमावस्या झाल्यानंतर कापूस पिकावर वेगवेगळ्या किड्यांचा अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो.

कापूस पिकामध्ये प्रामुख्याने दोन समस्या आता सर्वात जास्त आहेत. पहिली म्हणजे मध्यंतरी पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणा त कापूस पिकाची पातेगळ होत आहे.

हे वाचा: e pik pahni; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ई पिक पहाणीस पुन्हा एकदा मुदतवाढ..!

आणि दुसरी गोष्ट म्हणजे कापूस पिकावर रस शोषणारी कीटक व बोंड आळी वर नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. या कीटकावर कसे नियंत्रण मिळवायचे व कोणती फवारणी करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया या लेखांमध्ये

शेतकरी मित्रांनो आजची जी फवारणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अमावस्या पोळा फवारणी या फवारणीमुळे तुमच्या कापसावरील सुरू झालेली बोंड आळी असेल, किंवा बाकीचे जे रस शोषणारे किडे असतील. किंवा त्यांनी घातलेल्या अंडी असतील.

त्याचबरोबर तुमच्या कापूस पिकामध्ये होणारी पातेगळ. या सर्व समस्या लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला एक उत्कृष्ट फवारणी औषध सांगणार आहोत. त्यामुळे त्या फवारणी औषधांचा आवश्यक वापर करा.

हे वाचा: रब्बी ज्वारी पेरताय, करा या वाणाची लागवड व मिळवा मोठ्या प्रमाणात उत्पादन..!

त्यामध्ये वापरत असताना प्रोफेएक्स सुपर, त्यामध्ये प्रोफिनोफोस आणि सायपरमेथ्रीन अशी दोन घटक येतात. हे औषध अंडी नाशक म्हणून सुद्धा काम करते. आळी नाशक म्हणून सुद्धा काम करते.

त्याचबरोबर जे रस शोषणारे कीटका वरती सुद्धा यामुळे नियंत्रण मिळवता येते. हे औषध वापरत असताना प्रतिपंपासाठी 30 ml इतके वापरायचे आहे. तसेच यासोबत वापरत असताना असाटाप ज्या मध्ये ऍसीपेट येत 75% हे सुद्धा वापरायचा आहे.

बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी हे कॉम्बिनेशन अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आळीवर सुद्धा आणि थ्रिप्स तुडतुडामावा यावर सुद्धा हे कॉम्बिनेशन नियंत्रण मिळून देयील.

हे वाचा: रब्बी हंगामात करा या गव्हाच्या वाणाची लागवड, व मिळवा अधिक उत्पादन

असाटाप चा वापर करत असताना आपल्याला प्रतिपंपासाठी 30ग्रॅम वापरायचे आहे. त्याचबरोबर कापूस पिकामध्ये होणारी पातेगळ थांबवण्यासाठी पात्याच रूपांतर बोंडामध्ये करण्यासाठी टाटा बार कॉम्बिनेशन उपयोगकरणे आवश्यक आहे.

टाटा बार प्रतिपंपासाठी 40 ml वापरणे आवश्यक आहे. यासोबत बोरॉन 30 ग्राम वापरायचे आहे. अशाप्रकारे या चार औषधांची एकत्रित फवारणी करून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी याची फवारणी करायची आहे.

Leave a Comment