यावर्षी कापसाचे भाव वाढणार का..? जानेवारी महिन्यात कसे राहतील कापसाचे बाजार भाव..? जाणून घ्या सविस्तर Cotton market price

Cotton market price: दरवर्षीपेक्षा या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मानसून काळातच सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.

विशेष करून सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांना पावसा अभावी मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र शासनाने या सर्व परिस्थितीची दखल घेत 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 13 ऑक्टोबर 2023

महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादनात मोठी घट पाहायला मिळत आहे.

कापूस पिकाचा विचार केला असता दरवर्षीपेक्षा यावर्षी कापूस उत्पादनात 30 ते 35% टक्क्यांनी घट येऊ शकते. अशी जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे.

ही कापसाची घट पाहता भविष्यात कापसाला चांगला भाव मिळू शकतो असा अंदाज देखील जाणकारांनी व्यक्त केला आहे. तूर्तास जरी कापसाचे बाजार भाव दबावत असले तरी भविष्यात आणखीन वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

हे वाचा: संपूर्ण देशातील आजचे कापुस बाजार भाव..! पहा 2023 कापूस बाजार भाव काय असतील..?

दसऱ्यापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कापसाची मोठी आवक पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर बाजार भाव देखील मोठा बदल पाहायला मिळाला आहे.

यावर्षी मान्सून काळात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कोरडवाहू जमिनीवरचे कापसे जळून खाक झाली आहेत. सध्या बाजारामध्ये फक्त बागायती कापूस पहायला मिळत आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय होती. व ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे. अशा भागातील शेतकऱ्यांनाच कापसाचा चांगला उतार पाहायला मिळालेला आहे. परंतु कोरडवाहू भागातील कापूस अजून वेचणीसाठी सुद्धा पाहिजे तेवढा परिपक्व झालेला नाही.

हे वाचा: महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव 26 सप्टेंबर 2023 soyabean bajar bhav today

याचाच परिणाम म्हणून बाजारातील कापसाचे प्रमाण घटले आहे. आवक मोठ्या प्रमाणात असताना देखील बाजार भाव दबावतच असल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. व शेतकऱ्यांच्या मनात भविष्यात कापसाला कसा भाव राहील हा प्रश्न खेळावत आहे.

जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीमध्ये कापसाचे भाव कसे राहू शकतात याबद्दल तज्ञ लोकांनी माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार यावर्षी जानेवारी मार्च महिन्यात कापसाला सात हजार ते आठ हजार प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळू शकतो.

Leave a Comment