यावर्षी कापूस 10000 रूपये प्रति क्विंटल होणार..? काय म्हणतात तज्ञ..? cotton market rate

cotton market rate:  कापूस हे पीक नगदी पीक असून महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाचे उत्पादन घेतले जाते. संपूर्ण देशाचा कापसाचा लागवडीखालचा विचार केला असता सर्वात जास्त लागवड ही महाराष्ट्रात केली जाते. त्यातली त्यात प्रामुख्याने मराठवाड्यात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

परंतु उत्पादनाच्या बाबतीत गुजराती राज्य एक नंबर वर असून महाराष्ट्राचा दुसऱ्या क्रमांकावर नंबर येतो. गुजरात मध्ये लागवडीखालील क्षेत्र जरी कमी असले तरीसुद्धा गुजरात मध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. परंतु उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातपेक्षा मागेच आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांनो कोणताही खर्च न करता काढा आपल्या शेत जमिनीचा नकाशा घरी बसल्या..! Land Mapping

कापूस हे जरी नगदी पीक असले तरी मागील वर्षापासून ते शेतकऱ्यांना डोईजड झाले आहे. गेल्या हंगामात कापसाला चांगला बाजार भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस लागवडीचा खर्च देखील भरून निघला नाही. cotton market rate

गेल्या वर्षी तर नाहीच परंतु यंदा तरी कापसाला चांगला भाव मिळेल अशी आशा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आहे. परंतु ही शेतकऱ्यांची इच्छा अशीच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांना यावर्षी वाटत होते की कापसाला दहा हजार रुपये भाव मिळेल. परंतु बाजारातील स्थिती पाहता व तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी कापसाचा बाजार भाव दहा हजारांचा टप्पा पार करणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. cotton market rate

हे वाचा: बँकेत जमा होणार आज नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता; पहा यादी Namo Shetkari Sanman Scheme

त्यामुळे नगदी पीक म्हणून ओळखला जाणारा कापूस यावर्षी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अडचणीत आणणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाजारामध्ये नवीन कापसाची आवक होताना दिसत आहे.

दिवाळी सारखा सण जवळ आला असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. त्यामुळे शेतकरी नवीन कापसाची विक्री करताना दिसत आहेत.

केंद्र सरकार द्वारे यावर्षी लॉंग स्टेपल कापसाला 7 हजार 20 रूपये प्रतिक्विंटल एवढा भाव देण्यात आला आहे. तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी 6620 इतका भाव देण्यात आलेला आहे.cotton market rate

हे वाचा: सोन्याच्या किमतीत वाढ; युद्धानंतर 3300 रुपयांनी महागले gold rate increase

तज्ञांच्या माहितीनुसार कापसाच्या बाजारभावावर कापसाचा शिल्लक साठा, कापसाची बाजारातील मागणी, त्याचबरोबर सरकीच्या दरातील चढ-उतार हे तीन घटक प्रामुख्याने परिणाम करत असतात.

परंतु यावर्षी या तिन्ही घटकांचा विचार केला असता . यावर्षी कापसाला 7500 रुपये प्रतिक्विंटल एवढा मिळू शकतो. त्यामुळे यावर्षी कापूस दहा हजारांचा टप्पा पार करणार शेतकऱ्यांची ही आशा धुळीस मिळेल असे सांगितले जात आहे.

हे पण वाचा: यंदा कापूस 10 हजाराचा टप्पा गाठणार की नाही ? तज्ञांनी स्पष्टच सांगितलं

हे पण वाचा: पंजाबराव डख यांचा पावसा विषयी नवीन अंदाज; रब्बी पेरणीसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना Panjab Dakh Havaman Andaj

Leave a Comment