पिक विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप अंतिम टप्प्यात;धनंजय मुंडे यांची माहिती Crop Insurance Advance Amount

Crop Insurance Advance Amount: पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेअंतर्गत 25% अग्रीम पिक विमा चे वाटप जोरदार सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील जवळपास 47 लाख नुकसान भरपाई अर्जांची मंजुरी देण्यात आलेली आहे. व यासाठी 1 हजार 954 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.

या निधीपैकी एकूण 965 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले असून उरलेल्या रकमेच्या वाटपाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख फिक्स Namo Shetkari Yojana

यंदाच्या पावसाळ्यात पाऊस अपुरा राहिल्याने खरीप हंगामातील शेतीला मोठा फटका बसला. यामुळे राज्य सरकारने 24 जिल्ह्यांसाठी पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचना काढली होती. यापैकी 12 जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांचा कोणताही आक्षेप नाही. उर्वरित जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत.

त्याचबरोबर सध्याच्या जास्तीत बुलढाणा, बीड, वाशिम,नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर,पुणे अमरावती या जिल्ह्यांमध्ये विमा कंपनीच्या अक्षेपावरसुनावणी सुरू असून पुणे आणि अमरावती वगळता ईतर ठिकाणची सुनावणी संपली आहे. अशी माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.

राज्य सरकारने 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे. 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली असून, त्यांना 8 हजार 16 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरावा लागणार आहे. यापैकी 3 हजार 50 कोटी रुपयांचा पहिला हप्ता भरण्यात आला आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांनो phonepe वरून घ्या 2 मिनिटात 3 लाख रुपयांचे लोन..! असा करा अर्ज phonepe loan

दुसरीकडे, राज्यात रबी हंगाम सुरु झाला आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत सरासरी 86 टक्केच पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा कमी आहे. त्यामुळे रबी पिकांच्या पेरणीला मंद प्रतिसाद मिळत आहे.

आतापर्यंत 15 लाख हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली असून हे एकूण नियोजित पेरणीच्या केवळ 28 टक्के आहे. गेल्या वर्षी या काळात 13 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.

ज्वारी हे महत्वाचे पीक असून, त्याच्या 17 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही नियोजित पेरणीच्या 45 टक्के आहे. हरभरा पिकाच्याही केवळ 26 टक्के पेरणी झाल्याचे सांगण्यात आले.

हे वाचा: या जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा..! Crop insurance new update

Leave a Comment