सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचा पिक विमा मंजूर..! पहा मंडळांची नावे

शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये 2023 खरीप पिक विमा सोलापूर या जिल्हा विषयी मोठी अपडेट पाहणार आहोत. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सहा सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली होती.

ज्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस, सोयाबीन, मुग, बाजरा, कांदा ,भुईमूग या पिकांच्या नुकसानीचा विमा प्रदान केला जाईल. सोलापूर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळांना 25% अग्रीम पिक विमा मिळणार आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील टोमॅटो बाजार भाव 5 सप्टेंबर 2023

सोलापूर जिल्ह्यातील एकूण 47 महसूल मंडळात सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पात्र असलेल्या महसूल मंडळाची यादी आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत…

सोयाबीनचा अग्रीम पिक विमा प्राप्त झालेल्या मंडळाची नावे खालील प्रमाणे..

दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर तालुका, उत्तर सोलापुरातील उत्तर सोलापूर तालुका, मावळ तालुक्यातील: नरखेड आणि सावळेश्वर या मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

हे वाचा: पाऊस न पडल्यास पिक विमा नाही..!

अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, बार्शी तालुक्यातील नारी, पांगरी, उपळे, दमळा, गोडगाव, वैराग, सुरडी, सौंदरे, हे मंडळ सोयाबीन या पिकाच्या अग्रीम पिक विमा साठी पात्र आहेत.

तुर पिकांचा अग्रीम पिक विमा साठी पात्र असलेली मंडळाची नावे खालील प्रमाणे..

दक्षिण सोलापूर तालुक्यातील: वळसंग, मुस्ती, बोरामणी, विंचूर, मृदाप आणि होटगी. उत्तर सोलापूर तालुक्यातील उत्तर सोलापूर या भागांचा समावेश करण्यात आला आहे. माहोळ तालुक्यातील नरखेड, आगणार, शेटफळ, टाकळी, सिकंदर वाघोली कामती आणि सावलेश्वर या मंडळांचा समावेश आहे.

हे वाचा: पंजाबराव म्हणतात या तारखेपर्यंत काढा सोयाबीन..! नाहीतर होईल नुकसान soyabean

त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातील सुद्धा बऱ्याच गावांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे.. अक्कलकोट तालुका: मेडगी, दुधनी, जेऊर, करजगी, चपळगाव, किनी व नागणसूर

बार्शी तालुका: पांगरी, नारी, पानगाव, उपळे, दामला, सुरडी, गोडगाव, सौंदरे

म्हाडा तालुका : कुरूडवाडी, रोपळे क, टेंभुर्णी, निमगाव टे, माडा व लऊळ

करमाळा तालुका: पोत्रे, करमाळा, सालसे, पांगरे, अर्जुन नगर, जिंती, केतुर

पंढरपूर तालुका: रोपळे, करकम, चाळे, पंढरपूर, पुलुज

मंगळवेढा तालुका: मारापुर, हुलजंती, आंधळगाव

माळशिरस तालुका: सदाशिवनगर, इस्लामपूर, अकलूज, व लवंगा

तूर या पिकाच्या पिक विमा साठी एकूण वरच्या 62 महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे.

कापूस पिकांचा विम्यासाठी खालील मंडळाचा समावेश करण्यात आला आहे.

सांगोल तालुका: नायबळा, कोळा, घेरडी शिवणे व मंगळवेढा तालुक्यातील मारापुर इत्यादी.  वरील महसूल मंडळांना 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याचा सूचना सहा सप्टेंबर 2023 रोजी जारी करण्यात आले आहेत..  माहिती आवडल्यास समोर देखील शेअर करा धन्यवाद

Leave a Comment