या जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी 206 कोटी रुपयांचा अग्रीम पिक विमा मंजूर..! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी crop insurance approved

crop insurance approved: यावर्षी महाराष्ट्रात जवळपास सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पावसाअभावी आपली पिके गमावली आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार द्वारे पंतप्रधान खरीप पिक विमा योजना राबवण्यात आली.

जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत आपला सहभाग नोंदवला. आता या योजनेअंतर्गतच विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करणे सुरू करण्यात आले आहे.

हे वाचा: राज्यातील या जिल्ह्यातील 27 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये यादी पहा..! New Crop Insurance list 2023

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात सुद्धा अशीच काही परिस्थिती निर्माण झाली होती. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता परभणी जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील तब्बल 42 हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा देण्यासाठी अखेर पिक विमा कंपन्यांकडून 206 कोटी 11 लाख 14 हजार रुपये मंजूर करून देण्यात आले आहेत.

परभणी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्याचबरोबर ते म्हणले आहेत की, ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे.

पिक विमा कंपन्यांकडून तब्बल दोन ते अडीच महिन्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हे वाचा: या शेतकऱ्यांना मिळणार विहिरीसाठी 4 लाख रुपयाचे अनुदान..! वाचा सविस्तर Subsidy for wells

परभणी जिल्ह्यातील तालुका निहाय अग्रीम रक्कम…

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यासाठी 30 कोटी 92 लाख, सेलू तालुक्यासाठी जवळपास 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर मानवत तालुक्यासाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पाथरी तालुक्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, सोनपेठ तालुक्यासाठी 15 कोटी, गंगाखेड तालुक्यासाठी 24 कोटी, पालम तालुक्यासाठी 17 कोटी, पूर्णा तालुक्यासाठी 24 कोटी इतका अग्रिम मंजूर करण्यात आला आहे.

हे वाचा: दिवाळीच्या मुहूर्तावर या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 22000 हजार रुपये नुकसान भरपाई compensation for damages

Leave a Comment