या जिल्ह्यातील 11 तालुक्यात अग्रीम पिक विमा वाटप सुरू..! शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा Crop Insurance

Crop Insurance: बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरीप हंगामाच्या पिक नुकसानीबद्दल 241 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून थेट त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केले आहेत.

पिक नुकसानीचा पंचनामा केल्यानंतर, जिल्हाधिकारी व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना 25% पीक विमा अग्रीम म्हणून दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

हे वाचा: पहा तुमची शेत जमीन कोणाच्या नावावर आहे, व त्याचबरोबर किती क्षेत्रफळ आहे. फक्त एका मिनिटात Land Record

त्यानुसार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, आष्टी, बीड, धारूर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर व वडवणी अशा अकरा तालुक्यांमधील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर २४१ कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे.

यापैकी, अंबाजोगाई तालुक्यातील ८७ हजार शेतकऱ्यांना ३७ लाख, आष्टी तालुक्यातील ५ हजार शेतकऱ्यांना १२ लाख, तसेच इतर तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर संबंधित रकमा जमा केल्या असून, सर्व शेतकऱ्यांनी आपली बँक खाती तपासून पहावीत.

शेतकरी बंधूंनो, बीड जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील शेतकरी असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या खात्यावर पीक विमा अग्रीम रक्कम जमा झाली की नाही हे तपासून पहा.

हे वाचा: पहिल्या टप्प्यात या 13 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई..! यादी जाहीर compensation for damages

Leave a Comment