रब्बी पिकांचा पिक विमा 1 रुपयात..! अंतिम तारीख जाहीर Crop Insurance of Rabi Crops

Crop Insurance of Rabi Crops: महाराष्ट्र राज्यात ज्याप्रकारे खरीप हंगामात प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना अंतर्गत 1 रुपयात पिक विमा योजना राबवण्यात आली. त्याचप्रमाणे आता रब्बी हंगामात देखील 1 रूपयात पिक विमा योजना राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांचा पिक विमा भरण्यासाठी फक्त एक रुपया द्यावा लागणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा पिक विमा काढून घ्यावा असे आदेश कृषी अधिकारी रविशंकर चवडे यांनी दिले आहेत.

हे वाचा: अखेर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर..! पुणे नाशिक सह या जिल्ह्यांचा समावेश पहा तालुकानिहाय यादी..Drought declared

जर शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा पिक विमा काढला व काही नैसर्गिक आपत्तीमुळे जर त्यांच्या पिकाची नुकसान झाली तर त्याचे संरक्षण सरकारद्वारे दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिक विमा काढणे फायदेशीर आहे.

रब्बी हंगामातील पिक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत..

जर शेतकऱ्यांना हरभरा गहू व रब्बी कांदाचा पिक विमा भरायचा असेल तर त्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे. व ज्वारी पिकाचा पिक विमा काढण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे. त्याचबरोबर उन्हाळी भुईमुगासाठी व भातासाठी 31 मास पर्यंत अंतिम मुद्दत आहे.

हे वाचा: या 24 जिल्हात 1216 कोटी रुपयांचा अग्रिम पिक विमा मंजूर Crop Insurance

रब्बी हंगामातील पीक विम्याची योजना कर्जदार व बिगर कर्जदार सर्व शेतकऱ्यांसाठीच आहे. अधिसूचित पिकासाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

रब्बी हंगामातील पिक विमा भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे…

शेतकऱ्यांना त्यांचा रब्बी पिकाचा पिक विमा भरण्यासाठी आधार कार्ड, आधार नोंदणी ची प्रत, करारनामापत्र, स्वघोषणापत्र, आणि पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. शेतकऱ्यांनी त्यांचा पिक विमा भरताना बँक खाते क्रमांक व सर्वेक्षण क्रमांक द्यावा

हे वाचा: राज्यातील दुष्काळासाठी पुन्हा ९५९ महसूल मंडळ पात्र..! यादी जाहीर; धनंजय मुंडे यांची माहिती Dushkal Anudan Yojana

हे वाचा: दुसऱ्या टप्प्यात या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा नुकसान भरपाई..! Pik Vima Yojana

Leave a Comment