अखेर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती योजनेचा लाभ..! Debt Relief Scheme

Debt Relief Scheme: अहमदनगर जिल्ह्यातील खिडर्डी येथील भाऊसाहेब पारखे यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ त्यांना मिळाला आहे.

या योजनेचा लाभ राज्यातील इतरही शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ३० जून २०१६ रोजी थकीत असलेले मुद्दल आणि त्यावरील व्याजासह १.५ लाख रूपये मर्यादिपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हे वाचा: पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार 13 हजार 600..! पहा पात्र शेतकऱ्यांची यादी insurance

त्यानुसार लाभधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी भाऊसाहेब पारखे यांनी खिडीं सोसायटीकडून पीक कर्ज व संकरीत गाय कर्ज घेतले होते.

घेतलेले हे कर्ज योजनेननुसार पात्र ठरल्यामुळे शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले होते. मात्र, पोर्टल बंद असल्या कारणाने त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.

या संदर्भात लहू कानडे यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी देखील मांडली होती. पारखे यांनी या योजनेचा पाठ पुराव करत न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड. अजित काळे यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती.

हे वाचा: या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ..! पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर Loan waiver list

या याचिकेवर अॅड. अजित काळे यांनी चार वर्ष युक्तीवाद करत पारखे यांना न्याय मिळून दिला आहे. आता राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे पारखे यांनी सांगितले.

या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.

हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी पावसाची नुकसान भरपाई..! जिल्हानिहाय यादी जाहीर Nuksan Bharpai 2023

Leave a Comment