पाच मिनिटात करा ई पीक पाहणी..! शेवटची तारीख जाहीर

e pik pahni: खरीप हंगाम 2023 ई पाहणी करण्यासाठी अंतिम तारीख शासनाद्वारे 15 ऑक्टोबर जाहीर करण्यात आली आहे. आता फक्त ई पाहणी करण्यासाठी आठच दिवस शिल्लक राहिले आहेत. परंतु अजून सुद्धा राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करायची राहिली आहे.

सध्याही पीक पाहण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कशी ई पिक पाहणी पाहणी करावी. व त्याचे फायदे काय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हे वाचा: उरलेला शेतकऱ्यांना पिक विमा अग्रिम मिळणार तरी कधी..? पिक विमा कंपन्यांकडून तारीख स्पष्ट Advance crop insurance

यावर्षी पावसाने दिलेल्या खंडामुळे व दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई करण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात.

त्यामध्ये पिक विमा असेल परंतु याचा फायदा घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी करण्याचे टाळले तर कदाचित हे शेतकरी वरील योजना पासून वंचित राहू शकतात.

यावर्षी झालेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अशावेळी शेतकऱ्यांना पिक विम्यातून मोठा आधार मिळू शकतो असं म्हणलं जात आहे.

हे वाचा: ही पद्धत वापरून पहा आपल्या जमिनीचा नकाशा..! वाचा संपूर्ण स्टेप Online Land Map

परंतु पिक विम्याची मदत ई पिक पाहणी पूर्ण केल्यानंतरच भेटणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आहे.

अशाच शेतकऱ्यांना पिक विमा साठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही. अश्या शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर च्या अगोदर पीक पाणी पूर्ण करून घ्यावी.

ई पीक पाहणी महत्वाची का..?

हे वाचा: या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ..! पहा पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी KCC Loan Waiver List

राज्य शासनाने काढलेल्या नवीन आदेशानुसार शेतकऱ्यांना शेतात असलेल्या पिकांची माहिती ई पिक पाहणी अँप वर अपडेट करणे अनिवार्य झाले आहे. यातून असे ग्राह्य धरले जाते की तुमच्या सातबारावर पिकांची नोंद आहे.

जर कदाचित पाहणी केली नाही. तर तुमचा पिक पेरा उतारा कोरा दाखवला जातो. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे नुकसान याकरता मिळणारी नुकसान भरपाई. व पिक विमा घेण्यासाठी सुद्धा पीक पाहणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करणे आवश्यक आहे.

ई पीक पाहणी कशी करायची..?

ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर त्यांच्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी वर्जन 2 हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागेल. या नवीन ॲप मध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत.

ई पीक पाहणी ॲप उघडल्यानंतर काही परमिशन द्यावे लागतात. त्यानंतर तुम्हाला लॉगिनचे अनेक पर्याय दिसतील त्यापैकी शेतकरी म्हणून लॉगिन करा हा पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकून पहिल्या वेळेस खातेदार नोंदणीसाठी तुमचा तालुका जिल्हा व गाव निवडायचे आहे. व तुम्ही टाकलेला खाते क्रमांक ही नोंदवावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट किंवा पुढे बटणावर क्लिक करा.

त्यानंतर वापरकर्त्याला आपला नोंदणी केलेला नंबर बदलायचा आहे का असे विचारण्यात येईल जर बदलायचा असेल तर बदलू शकता. वरील नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल त्यामध्ये बरेच ऑप्शन देखील दिसतील.

अशाप्रकारे तुमच्या ई पीक पाणी चा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.त्यानंतर तुम्हाला करायचे असलेल्या वैयक्तिक पिक पाहण्याची नोंद तुम्ही त्या ॲपमध्ये करू शकता.

एकदा केलेली नोंद तुम्हाला 48 तासांमध्ये बदलता येते. जर तुमची पिक पाहणी पूर्ण झाली असेल. तुमच्या गावाचा ई पिक पाहणी यादीमध्ये तुमचे नाव हिरव्या अक्षरात दिसेल. वरील पद्धतीने पिक पाहनिची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Leave a Comment