सोयाबीन पिकासाठी करा या औषधांची तिसरी फवारणी..! आणि मिळवा टपोरे दाणे

शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की सोयाबीन या पिकासाठी तिसरी फवारणी कोणती घ्यायची. मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे. महाराष्ट्र राज्यातील सरासरी शेतकरी सोयाबीन या पिकाची लागवड करतात. व मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील काढतात.

परंतु यावर्षी पावसाने दिलेल्या खंडामुळे व मान्सून उशिरा आल्यामुळे शेतकऱ्याची पिके खोळंबली आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना कळत नाही की कोणती पेरणी करावा, सध्या सोयाबीनची तिसरी फवारणी कोणती करावी हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात खेळत आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव 11 सप्टेंबर 2023

तर त्याविषयी माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. तर चला पाहूया सोयाबीन पिकासाठी तिसरी फवारणी कोणती करावी. आज आम्ही तुम्हाला अशा औषधाबद्दल सांगणार आहेत. जे औषध मोठमोठे सोयाबीन उत्पादक शेतकरी वापरतात.

याचा रिझल्ट बघितल्यावर तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा विश्वास बसणार नाही. एवढे सोयाबीनचे दाणे टपोरे होणार. शेतकरी मित्रांनो तुम्हाला या फवारणी मध्ये वापरत असताना अमिनोजल विटोन कॉम्बो या तीन औषधांचा वापर करायचा आहे.

विटोन मध्ये झेब्रीलिक ऍसिड 0.0001% आहे. शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्ही विटोन चा वापर शेवटच्या फवारणी मध्ये करत असतात सोयाबीन साठी सोयाबीन मध्ये दाणे भरण्याचे काम विटोन करत असतं.

हे वाचा: कांद्याला मिळतोय 6000 हजार रुपये प्रति क्विंटल भाव..! वाचा सविस्तर..

त्याचबरोबर टपोरे दाणे बनवायचे काम सुद्धा विटोन करत असतं. यासाठी तिसऱ्या फवारणी मध्ये याचा वापर करायचा आहे. प्रतिपंपासाठी विटोनचां वापर 30 ml एवढा करायचा आहे. तसेच यासोबत आपल्याला दाण्यांची क्वालिटी चकाकी वाढवण्यासाठी अमिनोजलचा वापर करायचा आहे.

अमिनोजलचा वापर करत असताना ते 25 ग्राम एवढे वापरायचे आहे. तसेच शेतकरी मित्रांनो या फवारणीसाठी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच कॉम्बो हे 30 ग्रॅम एवढे वापरायचे आहे.

अशा या तीन औषधांची फवारणी आपल्याला एकत्र सोयाबीनची तिसरी फवारणी करताना करायची आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणता व्हीटोन हे दाणे भरायचे काम करत तर अमिनोजल आणि कॉम्बो चा काय वापर..? तरी मित्रांनो याचे महत्त्व आपण जेव्हा सोयाबीनला सुरुवातीला खत देत असतो.

हे वाचा: गट नंबर टाकून मिळवा आपल्या शेत जमिनीचा नकाशा घरी बसल्या..! Land map

सुरुवातीला पिकांसाठी आपण बरेच अन्नद्रव्य देत असतो. परंतु शेवटी सुद्धा काही अन्नद्रव्याची गरज असते. त्याच्या वाढीसाठी. या अन्नद्रव्याची परिणामी कमतरता भासली जाते. त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी व टपोरे दाणे बनवण्यासाठी अमिनोजल व कॉम्बो चा वापर केला जातो.

शेतकरी मित्रांनो याचा उपयोग एकदा करूनच पहा तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट चांगलाच मिळेल. माहिती आवडल्यास समोर देखील शेअर करा.

Leave a Comment