महाराष्ट्रात होणार दुष्काळ जाहीर..? पहा धनंजय मुंडे यांच मोठ भाकीत

या हंगामात मान्सूनचा पाऊस सुरुवातीपासूनच खूपच कमी पडला आहे. जून मध्ये येणारा मान्सून महाराष्ट्र राज्यामध्ये जुलैमध्ये दाखल झाला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात तब्बल पावसाने 21 ते 22 दिवस उघडीप दिली.

यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात तरी पुरेसा पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकरी बांधवांना होती. परंतु सप्टेंबर महिना सुद्धा अर्धा संपत आला तरी पावसाची अजूनही काही चाहूल नाही. मराठवाड्यासह अनेक भागात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचा: 25% आगाऊ पिक विमा म्हणजे नेमकी किती रक्कम मिळणार..! जाणून घ्या

दुष्काळाबद्दल धनंजय मुंडे काय म्हणतात पहा एकदा

विविध प्रसार माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी नमूद केले की, महाराष्ट्रात तब्बल 21 दिवसाच्या वरी पावसाचा खंड झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. ते नुकसान भरून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. भविष्यात अजून थोडा पावसाचा खंड राहिला तर नक्कीच दुष्काळ सुद्धा जाहीर होऊ शकतो. असे संकेत धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

खालील व्हिडिओमध्ये पहा धनंजय मुंडे काय म्हणतात दुष्काळाबद्दल..!

हे वाचा: कमीत कमी खर्चात मिळवा कापसावरील मावा,थ्रिप्स, तुडतुडे यावर नियंत्रण..!

 

हे वाचा: बाजारभावापेक्षा कमी दराने साखर विकून कोट्यवधींची वरकमाई sugar price

Leave a Comment