अखेर दुष्काळ अनुदानाची रक्कम वितरित करण्यास सुरुवात..! या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ; यादी जाहीर Drought declared

Drought declared: महाराष्ट्र मध्ये सुरुवातीच्या काळात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. परंतु कालांतराने इतर तालुक्यातील सर्वेक्षण केले असता पुन्हा 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचे घोषित करण्यात आले.

आता नव्याने दुष्काळ जाहीर झालेला महसूल मंडळांमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना योग्य त्या सवलती देखील लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी 10 नोव्हेंबर दरम्यान घेतला आहे.

हे वाचा: हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या मागण्या..! पिक विमा, नुकसान भरपाई, दुष्काळ व अवकाळी Crop Insurance, Compensation

केंद्र शासनाच्या निकषानुसार 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु इतर तालुक्यांमध्येही पावसाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे राज्य शासनाने 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.

पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जमीन महसूलात सवलत, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेती पंपाच्या वीज बिलात सवलत अशा स्वरूपाच्या सवलती देण्यात येतील. दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.

हे वाचा: गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाले या प्रकारे करा ऑनलाईन पद्धतीने वीमा तक्रार Insurance Complaint

पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरु ठेवणे, रोहयो अंतर्गत कामांना प्राधान्य देणे अशा उपाययोजना करण्यात येतील. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्क माफीची सवलत देण्यात येईल.

दुष्काळग्रस्त भागातील जनतेला त्वरित मदत मिळावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील असे आश्वासन देण्यात आले आहे. दुष्काळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन, प्रशासन आणि जनता एकत्र प्रयत्न करीत आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू..! मंत्री धनंजय मुंडे Crop insurance

Leave a Comment