या जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात दुष्काळ जाहीर..! या बाबींमध्ये मिळणार मोठी सूट; कृषिमंत्री धनंजय मुंडे Drought declared update

Drought declared update: महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील जालना जिल्ह्यात यावर्षी पावसाने चांगलीच पाठ फिरवली आहे. पावसाअभवी येथील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाकडून ऑनलाइन अहवालानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. परंतु जालना जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यात भयंकर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! या शेतकऱ्यांचे होणार तब्बल 2 लाखापर्यंत कर्ज माफ loan waiver

तरीसुद्धा पाच तालुक्यात राज्य सरकार द्वारे दुष्काळ जाहीर करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या संताप निर्माण झाला होता. तब्बल तीन तालुके दुष्काळ यादीतून वगळण्यात आले होते.

परतुर, घनसांगी, जाफराबाद या तालुक्यांचा समावेश दुष्काळ योजनेत करावा अशी मागणी थोर व्यक्तींकडून होत होती. अखेर राज्य शासनाने ही सर्व बाब लक्षात घेता. जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचा समावेश दुष्काळ यादीमध्ये केला आहे.

त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना आता दुष्काळ योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाणार आहे. जालना जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हे वाचा: या दिवशी जमा होणार 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता..! Namo shetkari

पिकांचे नुकसान तर झालेच परंतु पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील भाजू लागली आहे. तर दुसरीकडे जालना जिल्ह्याची अनेवारी ही 50 पैशांच्या आत असल्यामुळे केवळ पाच तालुक्यांमध्येच का जाहीर करण्यात आला होता.

व तीन तालुके यातून बरखास्त करण्यात आले होते. परंतु परिणामी राज्य शासनाच्या दुसऱ्या टप्प्यातील यादीमध्ये घनसावंगी परतुर व जाफराबाद या तालुक्याचा समावेश दुष्काळ यादीत करून घेतला आहे.

जालना जिल्ह्यात सुरू केल्या जाणार दुष्काळी उपाय योजना…

हे वाचा: या शेतकऱ्यांचा सोयाबीन,तूर,कापूस, पिकांचा पिक विमा जाहीर; शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी Crop Insurance

जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहिर झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आत्ता विविध बाबींमध्ये मोठी सूट मिळणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्कात माफी, पाणीटंचाई दूर करण्यासाठी मोफत टँकर सुरू करणे, पिक कर्जाची पुनर्घटन करणे, पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देणे या सर्व सवलती जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

हे वाचा: याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा; पहा यादी Crop Insurance List

Leave a Comment