राज्यातील दुष्काळासाठी पुन्हा 1021 महसूल मंडळांचा समावेश..! यादी जाहीर;मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती Drought Scheme

Drought Scheme: महाराष्ट्र राज्यात सुरुवातीला 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. कमी झालेल्या पावसामुळे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 75 टक्के पेक्षा अधिक उत्पन्नात घट घट झाली.

ही सर्व बाब लक्षात घेता महाराष्ट्र सरकार द्वारे सुरुवातीला चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ अनुदान योजना जाहीर करण्यात आली. या 40 तालुक्यांमध्ये अनेक बाबींमध्ये शेतकऱ्यांना सूट देखील देण्यात आली.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! ही बँक देणार शेतकऱ्यांना 7 लाखापर्यंत चे कर्ज loans

जसे की विज बिल थकबाकी मध्ये त्याचबरोबर त्या भागातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या परीक्षा फीस मध्ये देखील मोठी सवलत देण्यात आली. परंतु आता नवीन आलेल्या माहितीनुसार, या 40 तालुक्यांच्या व्यतिरिक्त अजून 1021 महसूल मंडळांचा समावेश दुष्काळात करण्यात आला आहे.

आत्ता या समावेश केलेला आहे 1021 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील दुष्काळाची आर्थिक मदत दिली जाणार आहे . पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 9 नोव्हेंबर दरम्यान मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

केंद्र शासनाच्या निकषानुसार सुरुवातीला कमी पावसामुळे चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. परंतु इतर भागांचा विचार केला असता त्या भागात देखील खूपच कमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यां निकषात बदल करून पुन्हा राज्यातील 1021 महसूल मंडळ दुष्काळामध्ये समावेश करण्यात आला आहे.

हे वाचा: उरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25% अग्रिम जमा होण्यास सुरुवात 25% advance crop insurance

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मिळणार या सवलती…

दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकार द्वारे विविध बाबी मध्ये सूट देण्यात आली आहे. जसे की जमीन महसूल मंडळात घट, पीक कर्जाची पुनर्गठण किंवा कर्जाच्या वसुली स्थगिती, त्याचबरोबर कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5% सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अशा विविध बाबींमध्ये शेतकऱ्यांना सुखी मिळणार आहे.

याविषयी तुम्हाला देखील संबंधित शासन निर्णय पहायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा 👇👇👇👇
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202311101718225419…pdf

हे वाचा: राज्यातील या तालुक्यांना वगळले दुष्काळग्रस्त यादीतून..! पहा यादी New Dushkal Anudan List

वरील सर्व सवलती 1021 महसूल मंडळात लागू करण्यात येणार आहेत.

Leave a Comment