महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर होणार ..! जाणून घ्या सविस्तर

नमस्कार शेतकरी बांधवानो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. राज्यात पावसाने तब्बल एक महिन्याचा खंड दिल्यामुळे चालू हंगामाची परिस्थिती बिकट झाली असून.

येत्या रब्बी हंगामाचे भविष्य पावसावरच अवलंबून आहे. महाराष्ट्र शेजारील कर्नाटक राज्यात दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे ‌. महाराष्ट्रात सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचा: या जिल्ह्यातील 160 गावांना मिळणार अग्रीम पिक विमा..! वाचा सविस्तर

परंतु राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्याचा विचारात नाही. त्यामुळे कर्नाटक सारखे महाराष्ट्रात का होऊ शकत नाही असा प्रश्न निर्माण होतो. कर्नाटकामध्ये एक जून ते 31 ऑगस्ट पर्यंत 30 टक्के पावसाची नोंद झाली.

कर्नाटकामध्ये आतापर्यंत एकूण 488 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तेथील सरकारने प्रशासनाला दहा दिवसात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची आकडेवारी गोळा करण्याची निर्देश दिले आहेत.

तेथील कृषी मंत्री लवकरच दुष्काळ जाहीर करतील असे संकेत दिसत आहेत. महाराष्ट्रात देखील पावसाच्या खंडामुळे शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. परंतु राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.

हे वाचा: अखेर कांदा अनुदान वाटप सुरू..! शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार इतकी रक्कम

महाराष्ट्रात जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये पावसात 11% घट झाली, त्याचबरोबर खरीप हंगामात पेरलेल्या पिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. शिवाय महाराष्ट्रातील काही भागात पिण्याच्या पाण्याचा समस्या देखील गंभीरपणे समोर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर होणार‌ का असा प्रश्न निर्माण होत आहे.

Leave a Comment