ई पिक पाहणी करा फक्त पाच मिनिटात मोबाईल ॲप हँग न होता..! जाणून घ्या प्रक्रिया

ई पिक पाहणी करण्याची तारीख वाढली आहे. शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती. परंतु ती वाढून 15 सप्टेंबर करण्यात आली आहे. आज आहे 10 सप्टेंबर परंतु अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करण्याची राहिली आहे.

त्याचं कारण म्हणजे ॲप हँग होणे किंवा अॅप न चालणे. याविषयीच आज आपण या लेखातून ईपीक पाहणी अगदी पाच मिनिटात कशी करायची हे पाहणार आहोत. तर चला जाणून घेऊ..

हे वाचा: राज्यात पुढील तीन तासात भयंकर पाऊस..!

यावर्षी ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसान भरपाईची आर्थिक मदत म्हणून सरकार शेतकऱ्यांना पिक विमा व विविध योजना उपलब्ध करून देते.

परंतु सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकाची ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे. बरेच शेतकरी ई पिक पाहणी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचे ॲप हँग होणे. व इतर समस्या शेतकऱ्यांसमोर येत आहेत.

तर चला जाणून घेऊया ही पिक पाहणी कशी करावी.  

हे वाचा: महाराष्ट्रातील टोमॅटो बाजार भाव 9 सप्टेंबर 2023

शेतकऱ्यांनी सगळ्यात अगोदर आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर वरून ई आहेत पीक पाहणी व्हर्जन 2 डाऊनलोड करून घ्यावे. या ॲपमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे हे नवीन अपडेटेड ॲप डाऊनलोड करून घ्यावे. (ई पीक पाहणी ॲप वर्जन 2)

ई पीक पाहणी करते वेळेस शेतकरी पिकाचा फोटो घेतील त्यावेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून ते त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंत अंतर दिसणार आहे. पिक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी निवडलेले स्थान जर त्यांच्या गटापासून लांब असेल तर त्याबाबत संदेश त्यांच्या मोबाईल मध्ये दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्या शेतातील पिकाचा अचूक फोटो घेता येणार आहे.

मोबाईल ॲप उघडल्यानंतर काही परवानग्या आपल्याला द्यावे लागतील. त्यानंतर आपल्याला त्यात मध्ये लॉगिन चे पर्याय दिसतील. त्यापैकी शेतकरी म्हणून पर्याय लॉगिन करा. त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल.

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे हरभरा बाजार भाव 9 सप्टेंबर 2023

जर तुम्ही पहिल्यांदा लॉगिन केलेले असेल तर तुम्हाला नोंदणीसाठी विभाग जिल्हा तालुका किंवा गाव निवडावे लागेल. आपण टाकलेला खाते क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट किंवा पुढे या बटणावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्याला आपला नोंदणी केलेला क्रमांक बदलायचा आहे.

का अशी माहिती विचारण्यात येते. जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्ही बदलू देखील शकता.तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर होम पेज दिसेल. अशाप्रकारे तुमची ई पिक पाहणी पूर्ण होईल.

Leave a Comment