शेतीसाठी मिळणार दिवसाही वीज, हे गाव पात्र वाचा यादी..! (Daytime Electricity)

पुणे जिल्ह्यात तब्बल 221 मेगावॅट वीज निर्मिती करणारा प्रकल्प चालू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ची अंमलबजावणी महावितरण कडून चालू आहे.

हा प्रकल्प एकूण 1,091 एकर मध्ये सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी ही जागा सरकारने भाड्यावर दिली आहे. शेतकऱ्यांना रात्री शिवाय दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी या योजनेची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेने होत आहे.

हे वाचा: पीएम किसान मानधन योजना..! सरकार देणार शेतकऱ्यांना 10000 रुपये महिना PM Kisan Mandhan Yojana

शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी सरकार सुद्धा मोठे प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी महावितरण सेवा केंद्राला गायरान जमीन हस्तारण करून दिली आहे.

याशिवाय याची जिल्हाधिकारी राजेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी सुद्धा जमीन हस्तांतरण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. बारामती मंडळात नवीन 23 उपकेंद्र स्थापन करण्यासाठी महावितरणाने एकूण 586 जमीन संपादित केली आहे.

तर लोणी देवकर आणि बाबुळगाव या महत्त्वाच्या उपकेंद्रासाठी 100 आणि 45 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. हे दोन सब स्टेशन सुमारे 20.16 आणि 9.38 मेगा वॅट इतकी वीज निर्मिती करतील.

हे वाचा: या 140 तालुक्यात सरसकट कर्जमाफी..! राज्य सरकारद्वारे महत्त्वाचा निर्णय loan waiver

हे उपकेंद्र सोडून या व्यतिरिक्त 21 उपकेंद्रासाठी महावितरण द्वारे 440 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. जी या 21 उपकेंद्रापासून 221 मेगावॅट निर्मिती करेल. या प्रकल्पामुळे बारामती मंडळातील शेतकऱ्यांना दिवसा देखील वीज उपलब्ध होईल.

योजनेचे फायदे

1) शेतकऱ्यांना दिवसा बीच उपलब्ध

हे वाचा: महाराष्ट्रातील 13 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पिक विमा जमा..! Crop insurance

2) शेतात पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जायची गरज नाही.

3) दिवसा वीज उपलब्ध झाल्याने उत्पन्नात देखील निश्चित वाढ होईल.

4) उत्पन्नात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल

प्रकल्पाची अंमलबजावणी

1) पहिल्या टप्प्यात म्हणजेच 2023-24 मध्ये हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.

2) व दुसऱ्या टप्प्यात 2024-25 मध्ये हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.

हा प्रकल्प बारामती मंडळातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एकच उद्देश आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी.

Leave a Comment