शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! एका महिन्याच्या आत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 25 टक्के आगाऊ पिक विमा

नमस्कार शेतकरी बांधवानो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या पावसाच्या खंडामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. खरीप हंगामात पेरलेली पिके करपून जात आहेत.

पावसा अभावी सर्वात मोठे नुकसान होत असेल तर ते शेतकऱ्यांचे आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी त्यांना आगाऊ पिक विमा उपलब्ध करून दिला जाईल असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

हे वाचा: सोयाबीन बाजार भाव 5 सप्टेंबर 2023

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात कमी झालेल्या पावसामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घटले. त्या शेतकऱ्यांना आगाऊ पिक विमा मिळण्याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आदेश काढले होते.

त्या आदेशाचे तंतोतंत पालन करून शेतकऱ्यांना आगाऊ पिक विमा विषयी निर्देश दिले आहेत. बीड जिल्ह्यातील 487 मंडळांना 25% अग्रीम पिक विमा मंजूर करून देण्यात आला आहे.

या अग्रीम पीक विम्याचे वाटप लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार आहेत. असे संकेत सुद्धा देण्यात आले आहेत.धनंजय मुंडे यांनी काढलेल्या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील एकूण 87 मंडळांना अग्रीम पिक विमा मिळणार असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा खूप मोठा आर्थिक फायदा झाला आहे.

हे वाचा: सोयाबीन कापूस मका पिक विमा मंजूर या जिल्ह्याला मिळणार 25 टक्के पिक विमा

Leave a Comment