शेतात बोअरवेल घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 80% अनुदान; येथून करा अर्ज

भारत आहे कृषिप्रधान देश आहे. या देशांमध्ये शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. देशाच्या अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असल्यासारखी आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा असणे आवश्यक आहे.

यावर्षी तर पावसाची मोठी कमतरता भासत आहे. त्यामुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. हे नुकसान वाचवण्यासाठी व शेतकऱ्यांना पाणीसाठा मिळण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते.

हे वाचा: महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 6 सप्टेंबर 2023

त्यापैकी एक योजना म्हणजे बोअरवेल अनुदान योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बोरवेल घेण्यासाठी अनुदान प्राप्त करून दिले जाते.
जर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल. तर त्यांना कृषी अधिकाऱ्यांशी भेट घ्यावी लागेल. तसेच आपले सरकार केंद्र मध्ये अर्ज करावा लागेल.

जर तुम्हाला घरी बसल्या मोबाईल द्वारे अर्ज करायचा असेल तर खालील प्रक्रिया अनुसरून करावे.

जर तुम्हाला बोरवेल अनुदान या योजनेसाठी मोबाईल द्वारे अर्ज करायचा असेल. तर तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुमची नोंद करावी लागेल. त्यानंतर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या योजनेसाठी अनुदान मिळेल.

हे वाचा: महाराष्ट्रातील या भागात ढगफुटी पहा अजून किती दिवस पावसाचे

त्या ऑफिशियल वेबसाईटवर वर नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक आयडी व पासवर्ड मिळेल. तो आयडी आणि पासवर्ड तुम्हाला नेहमी साठी तुमच्या कामात येईल. म्हणून त्याला महत्त्वाच्या ठिकाणी नोट करून घ्या.

हा आडी पासवर्ड मिळाल्यानंतर आपल्याला त्या ऑफिशियल वेबसाईटवर लॉगिन करायचा आहे. लॉगिन पूर्ण झाल्यानंतर आपण आपला अर्ज बोरवेल योजना अनुदानासाठी भरू शकता. अर्ज भरताना कोणतीही चूक होणार नाही. याची काळजी घ्यावी. अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे.

👇👇येथून करा अर्ज 👇👇👇👇👇👇

हे वाचा: महाराष्ट्रातील या कापूस बाजारपेठेत मिळतोय कापसाला सार्वधिक भाव... पहा सविस्तर

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login   

किंवा तुम्हाला जर सेवा केंद्रावर जाऊन अर्ज भरायचा असेल तर खालील संबंधित कागदपत्रे सोबत न्यावी लागतील.

1) ओळखपत्र ( आधार कार्ड किंवा मतदान कार्ड)

2) रहिवाशी दाखला
3) जमीन मालकीचा दाखला
4) उत्पन्नाचा दाखला
5) बोरवेल घेण्यासाठी लागलेला अंदाजित खर्च
6) अर्जाची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी तयार केली जाते.
7) जे पात्र अर्जदार आहेत. लॉटरी काढली जाते.

8) पात्र झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा केली जाते.

या योजनेची पात्रता

1) अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्रातला रहिवासी असावा

2) अर्ज करणारा अर्जदार शेतकरी असावा.

3) अर्जदाराच्या नावाने कमीत कमी जमिन 0.20 ते 6 हेक्टर एवढी असावी.

4) अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या शेतात सिंचनाची सुविधा नसावी.

बोअर वेल अनुदान योजनेचा लाभ..

1) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बोअरवेल घेण्यासाठी 80% अनुदान मिळेल.
2) शेतकऱ्यांना बोअरवेल घेण्यासाठी कमी खर्च येईल.
3) शेतीतील उत्पादन देखील वाढेल.

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना किती रुपये अनुदान मिळेल..?

शेतकऱ्यांना शेतात बोअरवेल घेण्याकरिता साधारणतः 20000 रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.

Leave a Comment